शहापूरमधील 54 गावांची तहान भागणार

शहापूर तालुक्यासाठी भावली धरणातून राबविण्यात येणार्‍या 316 कोटींच्या पाणी योजनेला किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. हे काम निविदा स्तरावर आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2021 Deputy Chief Minister Ajit Pawar said 24 Bills Approved In Winter Session

शहापूर तालुक्यासाठी भावली धरणातून राबविण्यात येणार्‍या 316 कोटींच्या पाणी योजनेला किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. हे काम निविदा स्तरावर आहे. त्यामुळे तालुक्यातील 54 गावांसाठी भातसा आणि तानसा धरणांतून जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणी योजना राबविणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची समस्या दूर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण

आश्रमशाळेत शिक्षित विद्यार्थ्यांच्या विकासात आश्रमशाळांचे मोठ्या प्रमाणात योगदान असून यातूनच आदिवासी समाजाचा विकास साध्य झाला आहे, असे सांगून शिक्षणाचा मूलभूत अधिकार आदिवासींना मिळवून देणार असून देशाच्या विकासासाठी दर्जेदार विद्यार्थी घडविण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा मानस आहे. त्यासाठी शिक्षण प्रणालीत बदल करून शिक्षकांच्या रिक्त जागी दर्जेदार शिक्षक नेमण्याचे आदेश देणार असल्याचे पवार म्हणाले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहापूर तालुक्यातील कोठारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला.

आदिवासी भाग दुर्लक्षित

आजही आदिवासी भाग दुर्लक्षित दिसून येत आहे. आदिवासी विभागाच्या विकासासाठी विविध योजना राबविणार असून रस्ते, रोजगार या गंभीर समस्यांसह धरणांच्या शहापूर तालुक्यातील पाण्याचे दुखणे कायमचे दूर करण्यासाठी जलमिशन योजनेतून विविध योजना राबविणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

यावेळी आदिवासी विकासमंत्री डॉ. के. सी. पाडवी, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख आमदार दौलत दरोडा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त हिरालाल सोनावणे आदी उपस्थित होते.