घरमहाराष्ट्रShahu Maharaj: छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या रणांगणात; 2024 ची लोकसभा लढवणार?

Shahu Maharaj: छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या रणांगणात; 2024 ची लोकसभा लढवणार?

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वारसदार छत्रपती शाहू महाराज यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून तिकीट मिळणार का? याबाबत चर्चांना आता वेग आला आहे.

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वारसदार छत्रपती शाहू महाराज यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून तिकीट मिळणार का? याबाबत चर्चांना आता वेग आला आहे. राजर्षी शाहू महाराजांचे वारस, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, राजघराण्याचे वलय या शाहू महाराज यांच्यादृष्टीने जमेच्या बाजू आहेत. त्यातून ही जागा महाविकास आघाडीतील शरद पवार गट किंवा काँग्रसेला मिळेल आणि तो पक्ष त्यांना उमेदवारी देईल, असे संकेत मिळत आहेत. (Shahu Maharaj Chhatrapati Shahu Maharaj on the battlefield of Kolhapur Will contest the 2024 Lok Sabha)

कोल्हापूरच्या जागेवर आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला आहे. पण या तीनही पक्षांनी संभाव्य उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याच नावाला पसंती दिली आहे. या पार्श्वभूमीवर या पक्षांच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी चर्चा झाली. महाराजांची उमेदवारी कोणत्या पक्षाकडून फायदेशीर होईल, याची चाचपणी करण्यात आली. त्यानुसार काँग्रेसला प्राधान्य देण्यात आले आहे. पवार आणि ठाकरे गटाची या मतदारसंघात असलेली मर्यादित ताकद आणि सहानुभूतीचा उपयोग कितपत होईल, याचा अंदाज घेतला गेला. त्यानंतर काँग्रेसला प्राधान्य देण्यात आले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे आज व उद्या पुण्यात आहेत. त्यानंतर सोमवारी त्यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्यांची संयुक्त बैठक मुंबईत होणार असून, त्यात जागा वाटपांसह काही मतदारसंघांतील उमेदवारांची नावेही निश्चित होणार आहेत.

काँग्रेसची प्रबळ दावेदारी

या जागेवर शिवसेनेकडून दावा सांगितला जात असला, तरी या घडीला त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील सोडल्यास कोणीही इच्छुक नाही. काँग्रेसचे या मतदारसंघात विधानसभेचे तीन व विधानपरिषदेचे दोन आमदार असल्याने त्यांची बाजू भक्कम आहे.

- Advertisement -

संभाजी राजेंचं काय?

माजी खासदार संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्षाकडूनच लढण्याचा आग्रह कायम ठेवल्याने, आघाडीला ते मान्य नाही. यामुळे त्यांचे नाव मागे पडले असून, नाशिक अथवा मराठवाडा, विदर्भातील एखाद्या मतदारसंघात त्यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

आघाडीकडून महाराजांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महायुतीकडून खासदार संजय मांडलिक यांना पर्याय  म्हणून काही  नावांभोवती चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये आता शौमिका महाडिक, राजेश क्षीरसागर, समरजित घाटगे ही नावे पुढे केली जात आहेत.

(हेही वाचा: Samruddhi Highway Accident: समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -