Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रAmbadas Danve : शक्तीपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, दानवेंकडून ग्वाही

Ambadas Danve : शक्तीपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, दानवेंकडून ग्वाही

Subscribe

शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी असल्याची ग्वाही विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली. मुंबई येथील आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित धडक मोर्चास आज (12 मार्च) उपस्थित राहून त्यांनी संबोधित केले

मुंबई : शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी असल्याची ग्वाही विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली. मुंबई येथील आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित धडक मोर्चास आज (12 मार्च) उपस्थित राहून त्यांनी संबोधित केले. (Shakti Peeth assures Ambadas Danve that it will stand firmly with the farmers affected by the highway)

अंबादास दानवे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापूर येथील सभेत सदरील शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा विरोध असेल तर राज्य सरकार हा महामार्ग करणार नसल्याचा आश्वासन दिलेला व्हिडीओ यावेळी दानवे यांनी दाखवला. यापूर्वीच राज्यातील देवस्थानांना जोडण्यासाठी चांगले रस्ते असताना शक्तीपीठ महामार्गाची काय आवश्यकता? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी राज्य सरकार विचारला. तसेच राज्य सरकार कंत्राटदाराच्या फायद्यांसाठी हा शक्तिपीठ महामार्ग करत असून शेतकरी हिताशी शासनाला काही देणे घेणे नाही, अशी टीका दानवे यांनी केली.

हेही वाचा – Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्ग करायचाय, लादायचा नाही; फडणवीसांचे विरोधकांना उत्तर

अंबादास दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आणि आता महायुतीचे सरकार आल्यानंतर सरकारला निवडणुकीपूर्वी दिलेल्या आपल्या शब्दाचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना राज्य शासनाकडून हा महामार्ग केला जात आहे. राज्य शासन अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्ग करत असेल तर शेतकरी बांधवांच्या आम्ही पाठीशी खंबीरपणे असल्याचा ठाम विश्वास अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांना दिला. तसेच, सदरील प्रकरणी विधान परिषद सभागृहात विरोधीपक्षांच्या वतीने स्थगन प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती यावेळी दानवे यांनी दिली. याप्रसंगी आमदार जयंत पाटील, सतेज पाटील, कैलास पाटील, सचिन अहिर, प्रवीण स्वामी, राजू नवघरे, राजू शेट्टी व दिलीप सोपल उपस्थित होते.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांचा मुद्दा विधानसभेत पुन्हा गाजला, पैसे देणार की नाही सांगा म्हणत विरोधक आक्रमक, मंत्री काय म्हणाल्या –