घर महाराष्ट्र "शक्तीपीठ महामार्गाने मराठवाड्याचे भाग्य बदलणार", फडणवीसांचा दावा

“शक्तीपीठ महामार्गाने मराठवाड्याचे भाग्य बदलणार”, फडणवीसांचा दावा

Subscribe

परभणी : “नागपूर-ते-गोवा शक्तीपीठ महामार्ग करणार आहेत. हा महामार्गाने मराठवाड्याचे भाग्य पूर्णपणे बदलणार, अशा प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे”, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम परभणीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारकडून लाभार्थ्यांना लाभ मिळत असून राज्याचे प्रत्येक निर्णय हे सर्व सामान्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “समृद्धी महामार्गामुळे एक मोठे परिवर्तन आपल्याला दिसत आहे. नांदेड परभणी समद्धी महामार्गाशी जोडणी करण्याच्या कामाला आमच्या सरकारने गती दिली. मुख्यमंत्र्यांनी जमीनीसाठी निधी उपलब्ध करून दिला. लकवर आम्ही ते काम सुरू करू आणि ते काम झाल्यानंतर परभणी जिल्ह्याचे चित्र बदलेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शक्तीपीठ महामार्गाने मराठवाड्याचे भाग्य बदलणार

- Advertisement -

फडणवीस पुढे म्हणाले, “आता नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग करण्यात येणार आहे. हा महामार्ग नागपूर ते गोवा असला. तरी ही मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांचे भाग्य पूर्णपणे बदलणार, अशा प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून उद्योग आणि मार्केट मिळण्याकरिता मराठवाड्याला याचा फायदा होणार आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर जनतेच्या अतिशय हिताचे निर्णय मोठ्या प्रमाणात घेत आहोत.”

सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे

फडणवीस म्हणाले. बनी तो बनी नाही तर परभणी, असे देखील म्हटले जाते. पण आता हम तीन साथ मैं आय हैं. यामुळे बनी तो बनी नाही तर आता बनी आणि परभणी दोन्ही असणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.”ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत आहे. त्या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिली,” असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘आज देश चंद्रावर चाललाय पण काही लोक घरात बसूनच’, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

परभणी शहरातील रस्ते आता काँक्रिटचे करू

“परभणी शहरातील रस्ते खराब झाले आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर खूप दूर उतरवण्यात आले. परभणीच्या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना रस्ते दाकवले की, पैसे मिळतील असे वाटले. पण मुख्यमंत्र्यांचे परभणीवर प्रेम आहे. काळजी करू नका. येत्या काळात परभणींचे चित्र बदलेले दिसेल. यामुळे यावेळी मुख्यमंत्र्यांना उद्देशून मुख्य रस्त्यांना काँक्रिटच्या रस्त्यात बांधले पाहिजेत”, फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisment -