घरठाणेआधी राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा, शंभूराज देसाईंचं राऊतांना थेट आव्हान

आधी राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा, शंभूराज देसाईंचं राऊतांना थेट आव्हान

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शिंदे गटाच्या नेत्यांना वारंवार आव्हानं दिली जात आहेत. राजीनामे द्या आणि पुन्हा निवडणूक घ्या, असं थेट आव्हान ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा देण्यात आली आहेत. दरम्यान, आधी राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा, असं थेट आव्हान शिंदे गटाचे मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी खासदार संजय राऊत यांना दिलं आहे.

शंभूराज देसाईंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही उद्धव ठाकरे यांचा कुठलाही आदेश मोडला नाही, म्हणून संजय राऊत खासदार झाले. ते आम्हाला गद्दार म्हणत आहेत. ते आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यामुळे आता त्यांनी राजीनामा द्यावा आणि परत राज्यसभेत निवडून दाखवावे, असं शंभूराज देसाई म्हणाले.

- Advertisement -

शिवसेनेमध्ये लोकप्रतिनिधींचं बहुमत हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहे. ५५ पैकी ४० आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. १८ पैकी १३ खासदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे नगरसेवकही आमच्याच बाजूने आहेत, असं शंभूराज देसाई म्हणाले.

आम्ही नियमांच्या घटनेचं आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचं गोष्टीचं पालन करून आणि कायद्याच्या चौकटीत राहून ही भूमिका घेतली आहे. आमच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असंही देसाई म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : काही लोक सर्वोच्च न्यायालयाला सल्ले द्यायला लागले; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -