Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रShambhuraj Desai : अधिकचा वाटा मिळावा असं प्रत्येक पक्षाला वाटतं; देसाई स्पष्टच...

Shambhuraj Desai : अधिकचा वाटा मिळावा असं प्रत्येक पक्षाला वाटतं; देसाई स्पष्टच म्हणाले…

Subscribe

प्रत्येक पक्षाला असे वाटतं असते की आपल्याला योग्य आणि अधिकचा वाटा मिळावा, असे वक्तव्य गृहराज्यमंत्री व शिवसेनेतील वरिष्ठ नेते शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.

मुंबई : महायुतीत प्रमुख तीन पक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी सत्तास्थापनेवर चर्चा केली आहे. तसेच काल (गुरुवार) दिल्लीच्या झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून येत्या दोन ते तीन दिवसामध्ये योग्य मार्ग निघेन, असे गृहराज्यमंत्री व शिवसेनेतील वरिष्ठ नेते शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. तसेच प्रत्येक पक्षाला वाटतं असतं की आपल्याला योग्य आणि अधिकचा वाटा मिळावा, असेही ते यावेळी म्हणाले आहेत. (Shambhuraj Desai On Chief Minister of Maharashtra.)

हेही वाचा : Rohit Pawar : “अजितदादा ‘CM’ झाले तर मी स्वत:…”, रोहित पवारांचं विधान चर्चेत

- Advertisement -

तसेच यामध्ये चर्चा काय झाली, मित्रपक्ष काय बोलले याच्यावर आता भाष्य करणे मला योग्य वाटत नाही. एकदा या चर्चेचा सांराश दिल्लीमधून येऊ द्या त्यानंतर यावर आपण बोलणार आहोत, असे देसाई म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंनी स्वत: हा सांगितले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महायुतीमध्ये जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू. त्यामुळे आता मागणे आणि चर्चा करणे यामध्ये काहीही गैर नाही. मात्र एकदा नेतृत्वावर निर्णय सोपवल्यावर त्यांच्या निर्णयाची वाट पाहणे तसेच जो नेतृत्वाकडून निर्णय येईल त्यावर पुढील कार्यवाही करणे हे योग्य असेल, असेही शंभूराज देसाई म्हणाले आहेत. तसेच येत्या एक दोन दिवसात सर्वच प्रश्नांची उत्तर मिळतील. तसेच प्रत्येक पक्षाचा मान राखून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : ECI vs Congress : शेवटच्या तासात मतदानाचा टक्का कसा वाढला? आयोगाने दिले हे स्पष्टीकरण

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र सोमवारी मध्यरात्रीपासून त्यांचा व पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांचा सूर बदल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरील दावा शिवसेनेने मागे घेतल्याने सत्तास्थापनेतील मोठा अडसर दूर झाला आहे. पण असे असले तरी, काल, गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत झालेल्या बैठकीत काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाकडे थेट गृह आणि नगरविकास खात्यासह 12 मंत्रिपदे मागितली आहेत. याशिवाय, अन्य मागण्यासुद्धा भाजपाश्रेष्ठींकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -