घरताज्या घडामोडीसंजय राऊतांमुळे ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले, शंभूराज देसाईंचा आरोप

संजय राऊतांमुळे ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले, शंभूराज देसाईंचा आरोप

Subscribe

पैसे घेतल्याचा पुरावा द्यावा राजकारण सोडुन घरी बसेन. आम्ही संजय राऊतांच्या कोणत्याही वक्तव्याला जास्त किंमत देणार नाही.

शिवसेनेतील ४० आमदारांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी या ४० आमदारांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या मागणीवर कोणताही निर्णय घेतला नाही. अखेर आमदारांनी विरोधी भूमिका घेतली. संजय राऊतांमुळे शिवसेनेवर अशी वेळ आली आहे. त्यांच्यामुळेच शिवसेनेतील ४० आमदार बाहेर पडले असा आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी केला आहे. आम्ही गद्दार नसून महाविकास आघाडीतील गळचेपीमुळे उठाव केला असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राऊतांना महत्त्व देत नाही असेही देसाई म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना शंभूराज देसाई म्हणाले की, संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जे बोलतात ते कधीच खरे ठरत नाही असे म्हणत या दोन्ही दिग्गज नेत्यांवर शंभूराज देसाई यांनी घणाघाती टीका केली आहे.

- Advertisement -

पैसे घेतल्याचा पुरावा दाखवा राजकरण सोडेन

शंभूराज देसाई सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय का घेतला याबाबत माहिती दिली. खासदार संजय राऊत यांनी पक्षांमध्ये वेळोवेळी केलेली ढवळाढवळ आणि आमदारांना दिलेली दुजाभावची वागणूक याचं घटनेला विरोध करत 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. तसेच पैसे घेतल्यामुळे शिंदे गटात आमदार सहभागी झाले अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावरसुद्धा शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे. पैसे घेतल्याचा पुरावा द्यावा राजकारण सोडुन घरी बसेन. आम्ही संजय राऊतांच्या कोणत्याही वक्तव्याला जास्त किंमत देणार नाही.

शरद पवारांच्या दाव्यात सत्य नाही

राज्यांमध्ये मध्यवर्ती निवडणुका लागतील असे भाकीत शरद पवार यांनी केलं आहे. परंतु त्यांच्या या वक्तव्यामध्ये सत्य नाही. शरद पवार जे बोलतात ते कधीच पूर्ण होत नाही. अनेकदा याचा अनुभव आलाय असे सांगत शंभूराज देसाई यांनी शरद पवारांवरसुद्धा टीकास्त्र डागलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शरद पवारांची भेट घेतल्याची अफवा, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून खुलासा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -