घरताज्या घडामोडीKirit Somaiya: सोमय्यांनी कायदा हातात घेतला तर.... - शंभूराज देसाईंचा इशारा

Kirit Somaiya: सोमय्यांनी कायदा हातात घेतला तर…. – शंभूराज देसाईंचा इशारा

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा पाडण्यासाठी दापोलीकडे रवाना झाले होते. यावेळी यांनी एक प्रतिकात्मक हातोडा आपल्यासोबत घेतला आहे. थोड्याच वेळात ते दापोलीत पोहोचणार आहेत. पण त्यापूर्वी माध्यमांशी बोलून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी किरीट सोमय्यांना इशारा दिला आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, किरीट सोमय्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर आमचे पोलीस हाताची घडी घालून बसणार नाहीत.

नक्की काय म्हणाले शंभूराज देसाई?

शंभूराज देसाई म्हणाले की, ‘सरकारी यंत्रणेवर त्यांचा विश्वास नसेल तर न्यायालय आहे. परंतु एखाद्या माणसाच्या मालमत्तेवर स्वतः जायचा प्रयत्न करायचा किंवा जाण्याच्या उद्देशाने निघायचे, हातोडा मारून मी तोडणार असे म्हणायचे. सोमय्यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला? अनिल परबांनी यापूर्वी केव्हाच सांगितले होते की, रिसॉर्ट आणि त्यांच्या काडीमात्राचा संबंध नाही. असे असताना ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय त्यांनी सांगितलंय की, त्यांचा काडीमात्राचा संबंध नाही. वारंवार त्यांचे नाव घ्यायचे, शो करायचा, माणसे जमावायची आणि त्या खासगी मालमत्तेवर जाऊन तोडायचा प्रयत्न करायचा हे पूर्णतः कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणारी कृती आहे. पोलीस अशी कृती सहन करणार नाही.’

- Advertisement -

‘सोमय्यांना राजकीय भांडवल करायचेय’

पुढे देसाई म्हणाले की, किरीट सोमय्या जबाबदार लोकप्रतिनिधी राहिले आहेत, एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था पालन करण्याचे काम करावे. सध्या याचे केवळ त्यांना राजकीय भांडवल करायचे आहे. अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. मी वारंवार सांगतोय, त्यांचा आक्षेप असेल, त्यांची हरकत असेल, त्यांची तक्रार असेल. आमच्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. महसूलची यंत्रणा, पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याकडे जावे. पण कायद्या हातात घेऊन, १०० गाड्या तिथे घेऊन जायच्या. जर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर आमचे पोलीस कधीही ते सहन करणार नाहीत.

‘जमाव जमवून आल्याने तिथे स्थानिक पर्यटक येतात. शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस आहेत. तिथल्या पर्यटनावर, पर्यटनावरील अवलंबून असणाऱ्या व्यवसायावर, विपरित परिणाम होतो. स्थानिक लोकांची तिथल्या प्रचंड नाराजी आहे. इतर कोणत्या सामान्य माणसाला सोमय्यांच्या कृतीमुळे जर त्रास होणार असेल, नुकसान पोहोचणार असेल, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होणार असेल तर आमचे पोलीस हाताची घडी घालून हे बघत बसणार नाहीत. आमचे पोलीस याचा सामान्य माणसाला त्रास होऊ नये, आणि ज्यामुळे त्रास होतोय, त्याचा अटकाव करण्याचा प्रयत्न याचा अधिकार आमच्या पोलिसांना दिलेला आहे, तो निश्चितपणाने आमची पोलीस यंत्रणावापरून योग्यप्रकारे कारवाई करतील,’ असे शंभूराज देसाई म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – अनिल परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -