घरताज्या घडामोडीपक्षानं सांगितले तर जशास तसं उत्तर देऊ, राणेंना विचारपूर्वक शब्द वापरण्याचे शंभुराज...

पक्षानं सांगितले तर जशास तसं उत्तर देऊ, राणेंना विचारपूर्वक शब्द वापरण्याचे शंभुराज देसाईंचा इशारा

Subscribe

आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री यामुळे नारायण राणेंनी शब्द विचारपूर्वक वापरावेत - शंभूराज देसाई

राज्यात अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मोठं नुकसान झाले आहे. राजकीय नेते मंडळी सांगली, कोल्हापूरमधील पुर परिस्थिची पाहणी करत आहेत. पाहणी दौऱ्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौरा केला यावेळी स्थानिक अधिकारी उपस्थित राहिले नसल्यामुळे अधिकाऱ्यांवर राणेंनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात भाष्य केलं होते. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुख्यमंत्र्यांवर केलेल्या भाष्यावर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

शिवसेना नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नारायण राणे यांना इशारा दिला आहे. राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे की, नारायण राणे यांचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात आहे. मात्र पक्षानं सांगितले आहे त्यामुळे आम्ही शांत आहोत, पक्षानं जर आदेश दिला तर नारायण राणे यांना जशास तसे उत्तर देऊ असा थेट इशारा राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री यामुळे नारायण राणेंनी शब्द विचारपूर्वक वापरावेत अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

- Advertisement -

अजित पवार यांचा नारायण राणेंवर पलटवार

कोकणात आलेल्या पुरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राजकीय नेते दौरे करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच दिवशी चिपळूण भागाचा दौरा केला या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत सर्व स्थानिक यंत्रणा आणि अधिकारी उपस्थित होते. यामुळे राणेंसोबत एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे राणेंनी मुख्यमंत्र्यांविरोधात अरे-तुरे शब्द वापरले होते. यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं होते. नैसर्गिक संकटाची पाहणी करायला आलेल्या काही लोकांनी मुख्यमंबद्दल अरे-तुरे असे शब्द वापरले आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही पूरग्रस्तांना भेटायला आला होता की अधिकाऱ्यांना भेटायला आला होता. असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

नारायण राणे काय म्हणाले

इथलं प्रशासन बेजबाबदार आहे. त्यांना नियामांची, प्रोटोकॉलची माहिती नाही. बाजारपेठेत आल्यावर एकही अधिकारी येऊन भेटले नाहीत. अॅडिशन कमिश्नर, प्रांत अधिकारी कार्यालयात बसून आहेत दोन विरोधी पक्षनेते, एक केंद्रीय मंत्री चिपळूणमध्ये आले असूनही ते भेटायला आले नाही. हा अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आहे आणि त्याबद्दल योग्य ती कारवाई केल्याशिवाय माझ्यासारखा माणूस गप्प बसणार नाही. केंद्रीय विभागात कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असे अधिकारी खुर्चीवर आमच्या विभागात राहता कामा नये लोकं रडत आहेत आणि अधिकारी मुख्यमंत्र्यांना पोहचवायला गेले आहेत. मुख्यमंत्री पाहुणे आहेत का? त्यांचे कामच आहे. अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -