कोरोनाच्या बचावासाठी सोन्याचं मास्क! किंमत तर बघा!

पुण्यातील एका व्यक्तीने कोरोनापासून आपले संरक्षण व्हावे, म्हणून चक्क सोन्याचे मास्क घातले आहे

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रूग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. या काळात लोकांच्या जीवनात एक गोष्ट कायमची जोडली गेली आहे, ती म्हणजे मास्क. कोरोना संक्रमणाच्या या काळात मास्क प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. लोक त्यांच्या स्वत: च्या आवडीनुसार वेगवेगळे मास्क डिझाइन करत आहेत.

कोरोनाच्या काळात विविध प्रकारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील एका व्यक्तीने कोरोनापासून आपले संरक्षण व्हावे, म्हणून चक्क सोन्याचे मास्क घातले आहे. सध्या या व्यक्तीची पुण्यासह सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड या भागात राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव शंकर कुरडे असून त्याने कोट्यावधी रुपये खर्च करून सोन्याचे मास्क तयार करून घेतले आहे. शंकर यांच्या मास्क किंमत २.८९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शंकर कुराडे हे गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत, कारण ते मास्क शिवाय इतरही अनेक सोन्याचे दागिने घालतात.

सध्या, त्यांचे सोन्याचा मास्क परिधान केल्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. तसेच त्यांना सोन्याची खूप आवड आहे आणि तो नेहमीच अंगावर ३ किलो सोनं घालतात. दहा बोटाने सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या गळ्यात साखळ्या आणि मनगटात ब्रेसलेट नेहमी शंकर यांच्या जवळ असते.

वृत्तसंस्था एएनआयने मास्क घातलेला शंकर कुरडे यांचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यावर लोकही प्रतिक्रिया देत करत आहेत. दरम्यान २ लाख ९० हजार रूपयांचा हे सोन्याचं मास्क बनवायला साधारण २ तोळं सोन्याचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी असेही सांगितले की, टीव्हीवर एकदा चांदीचे मास्क घातलेल्या व्यक्तीला पाहिले त्यानंतर मी देखील सोन्याचा मास्क तयार करण्याचा विचार केला.


Corona: कोल्हापुरात ‘या’ आगळ्या-वेगळ्या मास्कला ग्राहकांकडून मागणी!