Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मंत्री वडेट्टीवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नाशकात शंखनाद

मंत्री वडेट्टीवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नाशकात शंखनाद

Related Story

- Advertisement -

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये साधुंनी शंखनाद आंदोलन करत या वक्तव्याचा निषेध नोदंवला. रामकुंडावर हे आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी साधू महंतांनी हातात विरोधाचे फलक घेतले होते.

साधू हे स्वतःचे हित साधणारे असतात. संत हा समाजासाठी समर्पित असतो, यावर मी ठाम आहे. कुणाला कितीही टीका करू दे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला होता. यानिषेधार्थ आज हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या विचारधारेवर महाराष्ट्र उभा आहे. संत आणि साधू यामध्ये फरक आहे. संत हा समाजासाठी समर्पित आहे, तर संत म्हणजे दिशादर्शक आहे. साधू हे समाजाला लुबाडणारे आहे, यावर मी आजही ठाम आहे असे वडेटटीवार म्हणाले. या वक्तव्याचा निषेध नोंदवत भाजप अध्यात्मिक आघाडीने हे आंदोलन पुकारले होते. साधूंचा अपमान करण्याचा कोणाला अधिकार नाही. विजय वडेट्टीवार हे मनोरुग्ण मंत्री आहेत. हिंदू समाजाच्या पवित्र आणि सर्वस्व त्याग करुन साधना करत असलेल्या साधू परंपरेला अशा शिव्या घालणे मंत्र्यांना शोभत नाही अशी टीका तुषार भोसले यांनी केली.

- Advertisement -