Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसह ‘शांताबाई’फेम संजय लोंढे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसह ‘शांताबाई’फेम संजय लोंढे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Related Story

- Advertisement -

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांपोठापाठ आता लोककलावंत शांताबाई फेम गायक संजय लोंढे देखील राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या १६ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये कलाकारांची मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु होणार असल्याची चर्चा रंगत आहेत. यापूर्वी देखील अनेक मराठी कलाकारांनी राष्ट्रवादी घड्यात हाती घेतली. संजय लोंढे यांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार कलाकारांकरिता काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सुरेखा पुणेकर, संजय लोंढे यांच्यासह एकूण १२ कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली आहे. संजय लोंढे शांताबाई हा लोकप्रिय गाण्य़ामुळे प्रसिद्ध झोतात आले. या गाण्याला महाराष्ट्रात अक्षरश: डोक्यावर घेण्यात आले. त्यानंतर त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली. या गाण्याने तरुणाईला तर वेड लावलं होतं. याशिवाय गाण्यांच्या कार्यक्रमांना त्यांना आमंत्रण येऊ लागले. मात्र मागील काही काळापासून त्यांची लोकप्रियता कमी होत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता राष्ट्रवादी पक्षप्रवेशामुळे ते पुन्हा एकदा प्रसिद्धीत झोतात आले.

- Advertisement -

यापूर्वी अभिनेता अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना लोकसभेचे तिकिट देण्यात आले. शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. गायिका वैशाली माडे, कलाकार मेघा घाडगे, सविता मालपेकर अशा अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधले.


बुलढाण्यात वैद्यकीय प्रवेशासाठीच्या NEET परीक्षेत घोटाळा; केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून सारवासारव


 

- Advertisement -