घरताज्या घडामोडीठाण्याच्या शरद कुलकर्णींनी घडवला इतिहास, रशियातील सर्वात उंच शिखर केलं सर

ठाण्याच्या शरद कुलकर्णींनी घडवला इतिहास, रशियातील सर्वात उंच शिखर केलं सर

Subscribe

२०१४ साली एलब्रूस शिखरावरून अतिशय खराब हवामानमुळे मोहीम अर्धवट सोडून त्यांना परतावे लागले होते.

ठाण्याचे रहिवासी असलेल्या ज्येष्ठ गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी रशियातील सर्वात उंच असलेलं माऊंट एलब्रूस शिखर सर करुन नवा इतिहास घडवलाय. या वयात हे शिखर सर करणारे शरद कुलकर्णी हे पहिले भारतीय असल्याचा मान त्यांना मिळाला आहे. कुलकर्णी यांनी १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अतिशय कठीण हिमवादळाला सामोरे जात शिखरावर यशस्वी चढाई केली. या आधीही २०२० साली साऊथ अमेरिकेतील ‘माऊंट आकांकागुआ ‘ शिखर सर करणारे ते पाहिले वयस्कर भारतीय ठरले होते. २०१४ साली एलब्रूस शिखरावरून अतिशय खराब हवामानमुळे मोहीम अर्धवट सोडून त्यांना परतावे लागले होते.

शरद कुलकर्णी यांनी जिद्धीने परत यावेळी पण अतिशय खराब वातावरणाला सामोरे जाऊन त्यांनी भारताचा तिरंगा फडकवला. ही मोहीम त्यांची स्वर्गवासी पत्नी अंजली कुलकर्णी यांना समर्पित केली. त्यांचे २०१९ साली एव्हरेस्ट मोहिमे दरम्यान निधन झाले होते.

- Advertisement -

या आधी शरद कुलकर्णी यांनी दक्षिण आफ्रिकेतील किलीमंजारो, ऑस्ट्रेलियातील माऊंट कोझियेस्को, नेपाळ मधील माऊंट एवरेस्ट, मेरा पीक, लोबूचे पीक, भारतातील स्टोककांग्री, माऊंट हनुमान तिब्बा, काश्मीर मधील सनसेट पीक अशी अनेक शिखरे सर केली आहेत. उतार वयात इतर लोक निवृत्तीची भाषा करत असताना या वयात ही उंचीची शिखरे सर करून आपला छंद जोपासत इतरांसमोर एक उदाहरण समोर ठेवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -