संभाजीराजेंबाबत शरद पवारांचे भाजपावर गंभीर आरोप

Sharad Pawar

संभाजी राजेंनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी दुसरा उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

यावर भाजपने त्यांना मराठा आरक्षमावर बोलायला संधी दिली नव्हती. राजे हे एका समाजाचे नेते नसतात. त्यांनी घेतलेला निर्णयाचे स्वगत करायला हवे. पण भाजपने त्यांना चांगली वागणूक दिली नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. दरम्यान गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिले आहे. काही लोक बातमी होण्यासाठी स्टेटमेंट करतात. जर कुणी लोकांच्या संस्कृतीच्या विरोधात बोलले तर त्याला आम्ही विरोध करणार, असे शरद पवार म्हणाले.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपण अपक्ष लढणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक राहिलेली मते संभाजीराजेंना देण्यात येतील, असे जाहीर केले आहे. शिवसेनेकडून मात्र सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी संभाजीराजे आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. बैठकीत संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, त्यानंतर पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी अट घातल्याची माहिती मिळत आहे.