घरताज्या घडामोडीशरद पवार शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

शरद पवार शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Subscribe

शरद पवारांच्या पित्ताशयावर होणार शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यावर १० दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या खड्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शरद पवार यांना पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास असल्यामुळे त्यांना ३० मार्चला ब्रीच कँडी रुग्णालात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पित्ताशयातील खडा काढल्यानंतर त्यांना ३ एप्रिल रोजी घरी सोडण्यात आले होते.  उद्या (सोमवार १२ एप्रिल) शरद पवार यांचे पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मागील शस्त्रक्रिया झाल्यापासून शरद पवार घरीच विश्रांती घेत होते यानंतर आता पुन्हा शस्त्रक्रियेसाठी आज रुग्णालयात दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. तपासादरम्यान त्यांना पित्ताशयाच्या खड्याचा त्रास होत असल्याचे अहवालात समोर आले होते. यानंतर त्यांच्या पित्ताशयाच्या खड्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेच्या १० ते १२ दिवसांनंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती.

- Advertisement -

पहिली शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार यांना विश्रांतीची गरज असल्याने १२ दिवसांनी पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉ. मायादेव यांच्या नेतृत्वात वरिष्ठ डॉक्टरांची टीम शरद पवारांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करणार आहे. पित्ताशयाचे खडे काढण्याची शस्त्रक्रिया ही याच डॉक्टरांच्या टीमने केले होते.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी कोरोना लसीचा डोस घेतला आहे. जे.जे रुग्णालयातील एक टीम शरद पवार यांच्या घरी कोरोना लसीचा डोस देण्यासाठी आले होते. यानंतर शरद पवार विश्रांती घेत असतानाही त्यांनी राज्यातील घडामोडींचा आढावा घेतला होता. शरद पवार यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करण्याचेही आवाहन राज्यातील जनतेला केले होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -