दसरा मेळाव्यात मर्यादा ओलांडू नका, शरद पवारांचा सल्ला

Sharad pawar on Shinde and Fadnavis  Government

एका माणसाचे दोन भाग झाले. त्यानंतर दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली. संघर्ष हे होतच असतात. परंतु त्याला काहीतरी एक मर्यादा ठेवली पाहीजे. मर्यादा ओलांडून हे सर्व काही होत असेल तर ते गरजेचं दिसत नाही. राज्यातील जबाबदार लोकांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकली पाहिजेत. पावलं टाकण्याची जबाबदारी राज्याच्या प्रमुखांवर अधिक आहे. त्यामुळे कटुता वाढेल असं काही करू नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेच्या दोेन्ही गटाला दिला आहे.

शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेला मदत करण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीची बॅनरबाजी करण्यात आली आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शरद पवार म्हणाले की, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीही संबंध नाही. हा दसरा मेळावा उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा आहे. त्यामुळे यामध्ये अन्य भाषण करण्याचं काहीही कारण नाही.

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी २०१४ मध्ये प्रस्ताव आला होता. जेव्हा शिवसेना सत्तेत सहभागी झाली नाही. परंतु राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा दिला आणि शिवसेनेची कोंडी झाली. परंतु त्याचवेळीच सरकार स्थापन झालं असतं तर आताची राजकीय परिस्थिती वेगळी असती, असे अशोक चव्हाण म्हणाले, यावर प्रश्नावर पवार म्हणाले की, असा कोणीही प्रस्ताव दिलेला नाही. परंतु कोणी दिला असेल तर मग त्याच्यातलं मला माहिती असतं. राष्ट्रवादीचे निर्णय घेण्याचा अधिकार अन्य लोकांना आहे. परंतु अशोक चव्हाण जे काही बोलले ते मी कधीही ऐकलं नाही, असं शरद पवार म्हणाले.

अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भात शरद पवार म्हणाले की, आमच्या पक्षाची भूमिका ही आहे की, आम्ही शिवसेनेला पाठिंबा देणार, असं पवार म्हणाले.


हेही वाचा : कुणाच्या पाठीत वार करायचा नाही, केला तर..,शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचा आणखी एक टीझर