घरमहाराष्ट्रSharad Pawar : 'या' तारखेनंतर शरद पवार पुन्हा पक्षाच्या नवीन नावासाठी...; प्रफुल्ल पटेलांचा दावा

Sharad Pawar : ‘या’ तारखेनंतर शरद पवार पुन्हा पक्षाच्या नवीन नावासाठी…; प्रफुल्ल पटेलांचा दावा

Subscribe

प्रफुल्ल पटेल हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत. कारण आयोगाची ऑर्डर ही फक्त त्यांची वाचली आहे, असा टोलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला 6 फेब्रुवारीला दिले आहे. यानंतर शरद पवार गटाने बुधवारी ( 7 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या नावावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केला आहे. शरद पवार गटाने दिलेले नाव हे 27 फेब्रुवारीपर्यंतच राहणार असून यानंतर नवीन नावासाठी पुन्हा शरद पवार गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागणार आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, “निवडणूक आयोगाकडून देण्यात आले नाव हे राज्यसभेच्या निवडणुकीपुरते मर्यादीत आहे. 27 फेब्रुवारीनंतर शरद पवार गटाला नवीन नावासाठी अर्ज करावा लागणार आहे. या शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तीन नावे दिली होती, त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र हे नाव निवडणूक आयोगाने दिला आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – BREAKING : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी प्राप्तिकर विभागाचा छापा

आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार

आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांना दिली आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या निकषांचे उल्लघंन करून दिला आहे, असे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : मनसेत धुसफूस! राज ठाकरेंनी परशुराम उपरकरांना पक्षातून काढले

…तर मनगट आमच्याजवळच; आव्हाड

प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “प्रफुल्ल पटेल हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत. कारण आयोगाची ऑर्डर ही फक्त त्यांची वाचली आहे. आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आहोत ना. त्यामुळे आम्हाला इंग्रजी कळतच नाही. एनसीपी शरद पवार हे नाव रास्त आहे कारण राष्ट्रवादी जन्मदाते आहेत. मनगटावरील घड्याळ चोरून घेऊन गेले, तरी मनगट आमच्याजवळच आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -