घरमहाराष्ट्रSharad Pawar-Ajit Pawar : विधान परिषदेकडून दोन्ही गटांना नोटिसा; लेखी उत्तर मांडणण्याचे आदेश

Sharad Pawar-Ajit Pawar : विधान परिषदेकडून दोन्ही गटांना नोटिसा; लेखी उत्तर मांडणण्याचे आदेश

Subscribe

शरद पवार गटाचे 3 आणि अजित पवार गटाचे 5 आमदारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारशी हात मिळणी करत सरकारमध्ये सामील झाले. या प्रकरणी अजित पवार आणि शरद पवार गट या दोघांची कायदेशीर लढाई सुरू आहे. या प्रकरणी विधान परिषद विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील 8 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. यात शरद पवार गटाचे 3 आणि अजित पवार गटाचे 5 आमदारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे.

अजित पवार आणि शरद पवार गट या दोन्ही गटाला पुढच्या आठवड्यात लेखी म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेनुसार नोटीस बजावण्यात आलेली आहे. यात अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, आदिती तटकरे, अमोल मिटकरी आणि विक्रम काळे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांच्याकडून देखील याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत आमदार आमदार एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे आणि अरुण लड यांच्या नावाचा समावेश आहे. या दोन्ही गटाला नोटीस मिळाल्यानंतर नोटिसीला लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : “सरकारला लाज वाटली पाहिजे…”, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विजय वडेट्टीवार संतापले

नोटिशीला लेखी उत्तर देण्याचे आदेश

पक्षांतराच्या कारणावरून विधिमंडळातील सदस्यत्व रद्द करण्याचा उल्लेख नोटीसत केल्याची माहिती मिळाली आहे. या विधान परिषद सदस्य नियम 1986 अंतर्गत आपले म्हणणे लेखी स्वरुपात देण्याचे निर्देश दिले आहे. उत्तर दिले नाही तर यासंदर्भात तुमचे काहीच म्हणणे नसल्याचे गृहित धरून सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -