घरताज्या घडामोडीठाकरेंना भेटण्यासाठी पवारांनाही घ्यावी लागत होती वेळ; 'लोक माझे सांगाती'मध्ये खुलासा

ठाकरेंना भेटण्यासाठी पवारांनाही घ्यावी लागत होती वेळ; ‘लोक माझे सांगाती’मध्ये खुलासा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. शरद पवारांच्या या पुस्तकात उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शरद पवारांना वेळ घ्यावी लागत असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ न दिल्याने सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी बंड केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. मात्र असे असले तरी, महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Sharad Pawar Also Had To Take Uddhav Thackeray Appointment Big Revelation In The Book Lok Majhe Sangati 2)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. शरद पवारांच्या या पुस्तकात उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शरद पवारांना वेळ घ्यावी लागत असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

- Advertisement -

‘उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी प्रकृतीचा विचार करुन भेट घ्यावी लागत होती. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलताना असलेली सहजता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बोलताना संवादातील सहजता जाणवत नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या डॉक्टरांच्या वेळा, प्रकृती यामुळे भेटायला वेळ ठरवावी लागत होती’, असा खुलासा शरद पवार यांनी पुस्तकात केला. तसेच, ‘उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात फक्त दोन वेळा जाणं, हे आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं. रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचं वर्तमान कळत होतं, यावेळी मी वडिलकीच्या नात्यांने त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो’, असेही शरद पवार यांनी या पुस्तकातून स्पष्ट केले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत म्हणून शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली. बंड केलेले सर्व आमदार, खासदार उद्धव ठाकरे भेटण्यासाठी वेळ देत नव्हते, अशी तक्रार करत होते. अनेक शिवसेनेतील अनेक नेत्यांना मातोश्री व वर्षा बंगल्याबाहेर उद्धव ठाकरेंच्या भेटीची वाट पाहावी लागत होती. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -