घरमहाराष्ट्रप्रशांत किशोर आणि शरद पवार बैठक संपली, दोघांमध्ये तीन तास खलबतं

प्रशांत किशोर आणि शरद पवार बैठक संपली, दोघांमध्ये तीन तास खलबतं

Subscribe

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठक संपली आहे. तब्बल तीन तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे. बैठकीतील तपशीलाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ३ तासांच्या चर्चेत नेमकी कोणती रणनीती ठरली याची चर्चा आता सुरू झाली आहे. या भेटीमुळे राज्यासह देशाच्या राजकारणात काही बदल होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रशांत किशोर यांनी बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर संन्यास घेतला आहे. मात्र, देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे मानले जाणारे शरद पवार यांची प्रशांत किशोर यांनी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीत कोणती रणनीती ठरली याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. ही भेट केवळ महाराष्ट्रापुरती नसून राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसमोर काँग्रेसविरहित नवी आघाडी तयारी करण्यासंदर्भात चर्चा झाली असावी, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

शरद पवार यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनी निवडणुकांबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी कालच्या भाषणात पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकत्र असणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात असलं तरी चर्चांना मात्र उधाण आलं आहे.

पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशांत किशोर हे आधी मोदींसोबत काम करत होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहारमध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम पाहिलं. ममता बॅनर्जींचा विजयही त्यांनी सोपा केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना भेटले आहेत. त्यामुळे या भेटीत कोणती ‘पवार’फुल रणनीती ठरली हे जाणून घेण्याची सर्वांची उत्सुकता आहे.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -