Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रAssembly Election 2024 : शरद पवार अन् उद्धव ठाकरे झाले सतर्क, उचललं...

Assembly Election 2024 : शरद पवार अन् उद्धव ठाकरे झाले सतर्क, उचललं ‘हे’ मोठं पाऊल…

Subscribe

NCP Sharad Pawar, Shivsena Uddhav Thackeray : निवडून आल्यानंतर आमदार इकडून तिकडे उड्या मारण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनेक आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडली होती. आता विधानसभा निवडणुकीनंतर निवडून आलेल्या आमदारांनी साथ सोडू नये म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सतर्क झाले आहेत. दोन्ही नेत्यांची महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडीचे काटावर येण्याची शक्यता आहे. कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महायुतीकडून आमदार फोडाफोडी होऊ शकते. हीच भीती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अरेच्चा, उमेदवाराचे डिपॉझिट झाले जप्त; म्हणजे नेमके काय झाले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पष्ट बहुमत नाही मिळाल्यास महायुतीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सॉफ्ट टार्गेट ठरू शकतात. हीच भीती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी उमेदवारांकडून प्रतिक्षापत्र लिहून घेतलं आहे. त्यात निवडून आल्यानंतर तुम्ही पक्ष सोडणार नाही. तसेच, पक्षासोबत एकनिष्ठ राहणार, असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, 2022 आणि 2023 मध्ये शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही फूट पडली होती. हीच बाब लक्षात घेता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून सावधगिरी बाळगण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -