Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नागपूर मविआ सभेपूर्वी पवार - गडकरींची भेटी; 'हे' आहे कारण

मविआ सभेपूर्वी पवार – गडकरींची भेटी; ‘हे’ आहे कारण

Subscribe

ही भेट कशा संदर्भात होती या संदर्भात कोणाताही खुलासा करण्यात आला नसल्यामुळे भेटीचे कारण गुलदस्त्यातच असल्याचे समजते.

Sharad Pawar Met Bjp Leader Nitin Gadkari : शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी निवासस्थान सिल्व्हर ओकवर पोहोचले. त्यानंतर आज शरद पवार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. गेल्या २४ तासांत राजकीय क्षेत्रात घडलेल्या या मोठ्या घडामोडींमुळे आता राजकारण आणखी काय नवं घडणर का? यावर चर्चांना उधाण आलंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळच्या सुमारास ते नागपूर विमानतळावर दाखल झाले. आजपासून दोन दिवस त्यांचा नागपूर दौरा सुरू झाला असून एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीसाठी गेले. दुपारी दोन वाजताच्या सुमारास नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये एक बैठक देखील झाली. या बैठकीत त्यांच्यासोबत अनिल देशमुख सुद्धा होते. या तिघांनी मिळून एकत्र जेवणही केलं. तीन राजकीय मोठे नेते एकत्र आल्यामुळे या बैठकीत काही महत्त्वांच्या विषयावर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. संभाजीनगरमध्ये उद्भवलेल्या तणावाची परिस्थिती किंवा महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीविषयी या बैठकीत चर्चा होऊ शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर राजकारणात कधी काय होईल, याचा काही नेम सांगता येत नाही. त्यामुळे येत्या निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणात घडामोडी अतिशय वेगाने घडत आहेत. पुढील काळात राजकाणात मोठे बदल होतील, अशी चर्चा वर्तवण्यात येत आहे. शरद पवार यांनी विमानतळावरून वसंतदादा इंस्टिट्यूटच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर ते काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांच्या शेतावर गेले. तिथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी भेट दिली.

- Advertisement -

गेल्या दीड महिन्यात नागपुरात शरद पवार आणि नितीन गडकरी यांची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी १२ फेब्रुवारीला शरद पवार नागपूर आणि वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळीही परत जाताना विमानतळावर शरद पवार आणि नितीन गडकरी यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. वेगाने काम करण्यासाठी आणि नवनवीन कल्पना राबवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे ओळखले जातात. शरद पवार आणि भाजपमध्ये नातं बिघडलं असलं तरी त नितीन गडकरींचं आठवणीने कौतुक करत असतात. यापुर्वीही शरद पवारांनी अनेकदा कार्यक्रमात नितीन गडकरींचं कौतूक केलं आहे.

ही भेट कशा संदर्भात होती या संदर्भात कोणाताही खुलासा करण्यात आला नसल्यामुळे भेटीचे कारण गुलदस्त्यातच असल्याचे समजते. या तिन्ही नेत्यामध्ये कुठल्या मुद्यावर चर्चा झाली. याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.

- Advertisment -