घरमहाराष्ट्रKolhapur Voilence : शांतात राखा, कोल्हापूर राड्यावरून शरद पवारांचे जनतेला आवाहन

Kolhapur Voilence : शांतात राखा, कोल्हापूर राड्यावरून शरद पवारांचे जनतेला आवाहन

Subscribe

कोल्हापूर राड्याप्रकरणी राज्य शासनाने सामंजस्याची भूमिका घेतली, तर लवकरात लवकर ही स्थिती बदलून शांतता प्रस्थापित होईल, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा शांतता राखावी, असे आवाहन शरद पवार यांच्याकडून या निमित्ताने करण्यात आले आहे.

कोल्हापुरात बुधवारी (ता. 07 जून) आक्षेपार्ह पोस्टमुळे वातावरण तापलेले पाहायला मिळाले. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 36 जणांना ताब्यात घेतले आहे. यांतील 3 जण हे अल्पवयीन असल्याची माहिती कोल्हापुरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून देण्यात आलेली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या खात्याचा भार सांभाळण्यास असमर्थ ठरल्यांने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण या प्रकरणी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – Kolhapur Violence : पोलिसांकडून कोल्हापूर राड्याप्रकरणी 36 जणांना अटक

- Advertisement -

बारामतीमधून आज शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “राज्यात दोन ते तीन ठिकाणी ज्या काही घटना घडल्या त्या महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणाऱ्या नाहीत. त्यामुळे राज्याच्या सर्व सामान्य जनतेला आणि विशेषतः ज्या ठिकाणी या घटना घडल्या, त्या भागातल्या जनतेला कळकळीचे आवाहन आहे की, महाराष्ट्र हे संयमी, शांतता प्रिय राज्य आहे. या ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती नाही.”

कोणातरी जाणीपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना माझी विनंती आहे की, या घटनांची किंमत सामान्य माणसांना द्यावी लागते. त्यामुळे सामान्य माणसाच्या हितासाठी या घटना घडणार नाही, याची काळजी घ्या. शासकीय यंत्रणा विशेषतः पोलीस यंत्रणांना सहकार्य करण्याची गरज आहे. आपल्या सहकार्याने या गोष्टी तातडीने थांबू शकतात, असे शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

कोल्हापूर शहर असो की अन्य शहर असो. या सर्व शहरांचा सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. शाहू महाराजांचा आदर्श ठेवून सामान्य माणसांच्या हिताची जपणूक केली पाहिजे. तर या प्रकरणात राज्य शासनाने सामंजस्याची भूमिका घेतली, तर लवकरात लवकर ही स्थिती बदलून शांतता प्रस्थापित होईल, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा शांतता राखावी, असे आवाहन शरद पवार यांच्याकडून या निमित्ताने करण्यात आले आहे.

तर, दुधाच्या दराबाबत मी राज्य सरकारशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यातून मार्ग काढण्याची विनंती करणार आहे, असेही शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आज शेतीला जोडधंदा म्हणून दूधाचा व्यवसाय महत्त्वाचा झाला आहे. जिथे जिरायत शेती आहे तिथे दूध व्यवसाय संबंधित शेतकऱ्यांचा प्रपंच चालवतो. त्यामुळे दूधाचे दर घसरणे या सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. त्यामुळे मी पुढील काही दिवसात राज्य सरकारची भेट घेऊन याबाबतचा विचारविनीमय करणार आहे. यातून काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती करणार असून मुख्यमंत्र्यांची या प्रश्नासंदर्भात भेट घेणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -