घरताज्या घडामोडीशरद पवार CM असताना १० मिनिटात लतादीदींचे मोठं स्वप्न पुर्ण केलयं

शरद पवार CM असताना १० मिनिटात लतादीदींचे मोठं स्वप्न पुर्ण केलयं

Subscribe

पंडित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी मिळवून दिली होती पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे प्रकृती अस्वस्थ्यामुळे ब्रीच कंडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे अशा आशयाचे ट्विट शरद पवार यांनी काही मिनिटातच केले. पण लतादीदी आणि शरद पवार यांच्यात एकमेकांसाठी अतिशय आदर असल्याचे अनेक उदाहरणातून आणि प्रसंगातून दिसून आले आहे. यासाठीचे कारण म्हणजे शरद पवार यांचे शास्त्रीय संगीतावर असणारे प्रेम. शास्त्रीय संगीतामधील सर्वात आवडत्या गायिकांपैकी एक म्हणजे लतादीदी. याच लतादीदींनी पुण्यात वडिलांच्या नावे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा १० व्या मिनिटाला शरद पवारांनी लतादीदींना रूग्णालयासाठी जमीन उपलब्ध करून दिली होती.

- Advertisement -

शरद पवार हे सुरूवातीपासूनच शास्त्रीय संगीताचे चाहते आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या आर्य संगीत प्रसारक मंडळामार्फत झालेल्या पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीच्या अभिवादन कार्यक्रमातही शरद पवारांनी आवर्जून हजेरी लावली होती. या कार्यक्रमात शरद पवार यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. मराठी कानडी समाजात एकसंधता निर्माण करण्याचे कार्य पंडितजींनी केल्याचा त्यांनी उल्लेख केला होता. मराठी आणि कानडी या दोन्ही संस्कृतींना जोडणारे ते दुवा होते असे गौरवोद्गारही त्यांनी काढले होते. शास्त्रीय संगीताबद्दलचे पवारांचे प्रेम यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले होते. शरद पवार यांच्या शास्त्रीय संगीतामध्ये आवडत्या गायिकांपैकी एक अशा गायिका म्हणेज लता मंगेशकर. याच लतादीदींनी जेव्हा आपल्या वडिलांच्या नावाने हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्यांच्या मदतीला उभी राहणारी व्यक्ती म्हणजे शरद पवार. अवघ्या दहाव्या मिनिटाला शरद पवार यांनी या रूग्णालयासाठी जमीन उपलब्ध करून दिली. हीच आठवण काही दिवसांपूर्वीच मंगशेकर कुटूंबीयांकडून ताजी करण्यात आली होती.

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर खुद्द पंडित ह्दयनाथ मंगशेकर यांनीही मंगशेकर कुटूंबाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची घोषणा झाल्यानंतर ही आठवण नुकत्याच एका प्रसंगाच्या निमित्ताने सांगितली. मंगशेकर कुटूंबीयांनी रूग्णालयासाठी आपल्या वडिलांच्या नावे म्हणजे पंडित दीनानाथ मंगशेकर यांच्या नावे हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी जमीनीचा शोध मंगेशकर कुटूंबीयांकडून सुरू होता. लता मंगशेकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खाडिळकर आणि ह्दयनाथ मंगेशनकर या पाच भावंडांनी मिळून १९८९ साली लता मंगशेकर मेडिकल फाऊंडेशनचीही स्थापना केली होती.

- Advertisement -

आपले वडिल पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या नावे एक हॉस्पिटल सुरू करायचे आहे, त्यासाठी आम्ही मंगशेकर कुटूंबीय पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी जागा शोधत आहोत, अशी आठवण लतादीदींना शरद पवार यांना सांगितली. त्याचवेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शरद पवार यांनी लतादीदींच्या विनंतीला मान देत अवघ्या १० मिनिटात या हॉस्पिटलला जमीन मिळवून दिली. ही जमीनदेखील पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी अशी आहे. शरद पवारांबाबतची ही आठवण खुद्द ह्दयनाथ मंगेशकर यांनीही ताजी केली आहे. मुख्यमंत्री असताना अवघ्या १० मिनिटात जमीन मिळाली होती. आता महाविकास आघाडीचे सरकार असतानाच मंगेशकर कुटूंबीयांचे आणखी एक स्वप्न पुर्ण झाले आहे ते म्हणजे मंगेशकर कुटूंबाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचे. महाविकास आघाडी सरकारने पंडित ह्दयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेत १४ सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीकडून तीन महिन्यात या संगीत महाविद्यालयासाठीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. मुंबई विद्यापिठाअंतर्गतच हे शासकीय संगीत महाविद्यालय सुरू होणार आहे. मुंबई विद्यापिठाअंतर्गत सुरू होणारे हे पहिले महाविद्यालय असेल.

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावे कलादालन उभे रहावे हे लतादीदी आणि माई मंगेशकर यांचे स्वप्न होते. यासाठी गेल्या ४० वर्षांपासून मंगेशकर कुटूंबाने सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. प्रत्येकवेळी जागा मिळण्याचे आश्वास मिळाले होते. पण त्या आश्वासनांची पूर्तता होत नव्हती. पण ठाकरे सरकारने पुढाकार घेतल्यानेच या महाविद्यालयाचे स्वप्न आता पुर्ण होणार आहे अशी प्रतिक्रिया ह्दयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली आहे. आता प्रत्यक्षात उभ्या राहणाऱ्या महाविद्यालयासाठी मंगेशकर कुटूंबीयांकडून सरकारचे आभार मानण्यात आले आहेत.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -