घरमहाराष्ट्रविरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर, शरद पवारांचं केंद्र सरकारवर टीकस्त्र

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर, शरद पवारांचं केंद्र सरकारवर टीकस्त्र

Subscribe

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करतेय, असा हल्लाबोल पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला. कोल्हापूर येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसची संकल्प सभा होती. या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी केंद्रावर टीकास्त्र डागलं.

अलिकडच्या काळामध्ये अनेक गोष्टी सुरु झाल्या, सत्ता येते आणि सत्ता जाते, पण सत्तेत बसल्यानंतर पाय जमिनीवर ठेवायचे असतात, सत्ता डोक्यात जावू द्यायची नसते. सत्तेचा गैरवापर करायचा नसतो. दोन वर्षापूर्वी या देशामध्ये ईडी नावाचा विषय माहिती होता? आज काय दिसतंय. याच्यावर धाड घाला, याच्या घरी जा. याला अटक करण्याचा प्रयत्न कर. ईडी पाठव…सीबीआय पाठव…इनकम टॅक्सचे लोक पाठव. ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी सन्मानाने काम करत असताना त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रकार केला जातोय. आज राष्ट्रवादीच्या दोन सहकाऱ्यांना आत टाकलं. अनिल देशमुखांना आत टाकलं. त्यांच्यावर आरोपत्र सादर केलं. त्यामध्ये सांगितलं असं की १०० कोटींचा घोटाळा आहे. नंतर चौकशी झाली आणि त्या आरोपपत्रात बदल केला आणि १०० कोटी नाही ४ कोटींचा आहे. नंतर पुन्हा आरोपपत्र बदलं आणि आता सांगितलं १ कोटी ४ लाखाचं आहे. १०० कोटींनी सुरु करायची आणि शेवटी सांगायचं १ कोटीचं आहे. काही कारण नसताना एखाद दुसरा अधिकारी चुकीचा वागतो, त्या अधिकाऱ्याच्या संबंधित भूमिका घेतल्यानंतर, आज त्या अधिकाऱ्याची चौकशी चालू आहे. पण त्याला तुरुंगात टाकलं नाही. तो अधिकारी चुकीचा वागतोय ही भूमिका घेणारे अनिल देशमुख त्यांना तुरुंगात टाकलं, असं शरद पवार म्हणाले. पुढ ते म्हणाले, नवाब मलिक…त्यांना तुरुंगात पाठवलं. काय केस आहे, २० वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती. या २० वर्षात यांना ती जागा दिसली नाही. चेकने पैसे दिले, त्या ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय सुरु झाले. यात त्यांचं नाव अडकवण्यात आलं. त्यांना अटक केली. अनेकांना एकप्रकारची दमदाटी केली जाते. केंद्र सरकारला वाटत असेल, राष्ट्रवादी अन्य पक्षांविरोधात ईडी, सीबीआयचा वापर करुन त्यांचं काम बंद करु असं वाटतं असेल तर ते मुर्खांच्या नंदनवनात राहत आहेत. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता अशी कितीही संकटं आली तरी मजबूत राहून लढेल, असा मी विश्वास व्यक्त करतो, असं पवार म्हणाले.

- Advertisement -

एका संघर्षातून आपण जातो आहोत. आज हा देश एकसंध ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. २०१४ पर्यंत देशातील स्थिती वेगळी होती. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं. देशासमोर चे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणाणे कष्ट घेतले गेले. अनेक क्षेत्रांमध्ये उन्नती कशी होईल यासाटी प्रयत्न केले. २०१४ ची निवडणूक वेगळी झाली, भाजपच्या हातामध्ये सत्ता आली. लोकांचा कौल होता, लोकांचा कौल आम्ही अंतकरणाने स्वीकारला. पण आपण बघतोय
सत्ता हातात आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग, हा एक देश एकसंध कसा राहिल, लोकांचं दु:ख कसं कमी होईल, समाजातील घटक एकत्र कसे राहतील याची जबाबदारी कोणत्याही राष्ट्रीय नेतृत्वाची सरकारच्या प्रमुखांची असते. आज वेगळे चित्र दिसत आहे, असं पवार म्हणाले.

गेले काही दिवस देशाची राजधावी दिल्लीत हल्ले झाले, जाळपोळ झाले. केजरीवाल यांच्या हातामध्ये सत्ता असेल. दिल्लीचं गृहखातं त्यांच्या हातामध्ये नाही. ते अमित शहांच्या हातामध्ये आहे. त्यांनी देशाची राजधानी एका विचाराने एकसंध राहिल याची खबरदारी घेण्याची आवश्यकता होती. पण ते घेऊ शकले नाहीत. तुम्हाला हे सांगू शकतो, दिल्लीत काय घडले याचा संदेश जगामध्ये जातो आणि याठिकाणी अस्थिरता आहे, असा समज जगामध्ये होतो, असं पवार म्हणाले.

- Advertisement -

हुबळी सारख्या ठिकाणी दंगली झाल्या. अस्थिर वातावरण होईल असे निर्णय घेण्यात आले. आज कर्नाटकमध्ये समाजातील अल्पसंख्यांकांच्या लोकांबद्दल जाहीर बोर्ड लावले, काय बोर्ड लावले, या गावात अल्पसंख्यांकांचं दुकान आहे, त्या दुकानात कोणीही खरेदी करु नये, रेस्टॉरंट्समध्ये जाऊ नये. काय संदेश देतो आपण? हा संदेश देणारे लोक सत्ताधारी पक्षाचे आहेत. हे चित्र शेजारच्या हातात आहे. जिथे जिथे भाजपची सत्ता आहे, तिथे हिच अवस्था आहे. त्यामुळे एकप्रकारची आव्हानाची आवश्यकता आहे, असं आवाहन पवार यांनी केलं.

इथे एक निवडणूक झाली, मी कोल्हापुरच्या जनतेला धन्यवाद देतो. देश अडचणीत न्यायचा प्रयत्न सुरु असताना इथे झालेल्या निवडणुकीमध्ये इथल्या जनतेनं जे काही उमेदवार होते त्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्वांनी जो उमेदवार पुढे केला त्याला मोठ्या मतांनी आपण विजयी केलं. या भूमिकेबद्दल तुमचं अभिनंदन करतो. सर्वांनी आघाडीचा धर्म पाळण्याची कामगिरी केली. या निवडणुकीमध्ये मत मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण मत मागताना द्वेष वाढेल असं काम करु नये. एक सिनेमा काढला. काश्मीरबद्दलचा सिनेमा, एका काळामध्ये काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पंडितांवर हल्ले केले. त्या पंडितांना काश्मीर सोडून देशाच्या अन्य भागामध्ये यावं लागलं. ती अत्याचाराची फिल्म या ठिकाणी दाखवली गेली. त्याचा हेतू हा होता की जातीय संघर्ष वाढवायचा आणि त्या संघर्षाकतून मतांचा जोगवा मागायचा. हे काम भाजपने केलं. अनेकांना माहित नाही वस्तूस्थिती काय आहे. काश्मीरमध्ये जी स्थिती होती, त्यावेळेला देशाची सत्ता विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या हातामध्ये होती, त्यांच्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता. केंद्रामधील गृहखात्याचा मंत्री भाजपच्या पाठिंब्याचा होता. काश्मीरमध्ये असलेलं राज्य भाजपच्या पाठिंब्याचं होतं आणि म्हणून देशाची, राज्याची सत्ता त्यांच्याकडे असताना जे घडलं त्याचा गैरप्रचार संपूर्ण देशामध्ये करुन देशामध्ये माणसामाणसा मध्ये दुरावा वाढवण्याचं काम भाजपने केलं. कोल्हापूरच्या जनता ही समंजस, शहाणी आणि राष्ट्रप्रेमी आहे. द्वेष पेरणाऱ्यांना उत्तर दिलं, असं पवार म्हणाले.

इथे एक नेते आहेत, चंद्रकांत पाटील त्यांच नाव. त्यांनी जाहीर केलं होतं की निवडउकीत पराभव झाला तर जाईन कुठं तरी…कुठं…हिमालयात. कोल्हापूरकर हुश्शार, त्यांची अवस्था बघून त्यांचा बंदोबस्त केला. आरएसएसच्या शाखेत गेलेला शब्दाला पक्क असतो असं सांगतात. इथे जी घोषणा केल्यानंतर निकाल जो लागला, त्यानंतर माझी काळजी वाढली. पण ते हिमालयात जायला निघाले, ते नक्की तिथे जातात की नाही ते पाहण्यासाठी जयंत पाठील पाठीमागे निघाले. माझ्या वाचनात आले की ते देखील तिते जातायत. म्हणून त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की चंद्रकांत पाटील नक्की हिमालयात जातात का ते बघून येतो, मग येतो पुन्हा, असं मला जयंत पाटील यांनी सांगितलं, असं पवार म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -