Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांची स्थिती देवेंद्र फडणवीसांसारखी होते', शरद पवारांचे एका दगडात...

‘मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांची स्थिती देवेंद्र फडणवीसांसारखी होते’, शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी

Subscribe

छत्रपती संभाजीनगर – १५ ऑगस्ट २०२४ मध्ये देखील मीच लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण करणार, असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी खोचक टीका केली आहे. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांची स्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी होते, असे म्हणत पवारांनी एकाच दगडात दोन पक्ष मारले. मी पुन्हा येईन म्हणारे नरेंद्र मोदी यांनी यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेले दिसते, असाही टोला त्यांनी मोदींना लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहे. छ. संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकार अपयशी ठरले असल्याचा ठपका ठेवला. देशातील सध्याचे राजकीय वातावरण हे मोदी सरकारच्या विरोधात आहे. असे असतानाही ते मी पुन्हा येईनची लाल किल्ल्यावरुन घोषणा देते आहेत. तशी सध्या देशातील स्थिती नाही, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Sharad Pawar : भाजपा आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न; शरद पवारांनी सांगितली रणनीती

२०२४ मध्ये मोदींसाठी अनुकुल स्थिती नाही 

पंतप्रधान मोदींच्या मी पुन्हा येईन वाक्यावरुन पवारांनी देवेंद्र फडणवसींचे मी पुन्हा येईन या वाक्याची आठवण करुन देत, जे असे वक्तव्य करतात ते परत येत नाही, असा टोला भाजपच्या दोन्ही नेत्यांना लगावला. पवार म्हणाले, ‘२०२४ मध्ये मोदी सरकारसाठी अनुकूल अशी देशातील स्थिती नाही. महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथे विद्यामान सरकार पाडून भाजप सत्तेत आली आहे. गोव्यातही त्यांनी आधी तेच केले होते. गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये भाजप बहुमतात आहे. मात्र केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंड, हिमाचल प्रदेश, बिहारमध्ये भाजप कूठेच नाही. त्यामुळे मी पुन्हा येईनसाठी अनुकूल स्थिती सध्यातरी नाही. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांची स्थिती देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी होईल.’ असाही टोला पवारांनी मोदींना लगावला.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘मी पुन्हा येईन’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यातून त्यांची सत्ता गेली. त्यानंतर शिवसेना फोडून, एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष आणि फडणवीस पुन्हा सत्तेत आले. मात्र त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली आणि उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले आहे. त्यावरुनही पवारांनी खोचक टीका केली.

हेही वाचा : Sharad Pawar : लहान लोकांवर भाष्य करणार नाही; अजित पवारांवर निशाणा साधताना ‘त्या’ ऑफरवर केले भाष्य

‘केंद्र सरकार विभाजनवादी’

केंद्रातील मोदी सरकार आणि त्यांचे घटक हे देशात सध्या विभाजनवादी राजकारण करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. दोन समाज, दोन समुह, दोन भाषा यांच्यामध्ये वाद कसा निर्माण होईल या दृष्टीने सध्याचे केंद्र सरकार काम करत असल्याचा आरोप पवारांनी केला. देशातील सामाजिक एकता नष्ट करण्याचे काम केले जात असल्याचे पवार म्हणाले. यासाठी त्यांनी केंद्रीय शाळांमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘पार्टिशन डे’चे उदाहरण दिले. १० ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाने केंद्रीय विद्यालयांमध्ये १४ ऑगस्ट हा पार्टिशन डे साजरा करण्याचे आदेश काढले आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची फाळणी झाली. १४ ऑगस्टला पाकिस्तानची निर्मिती झाली. फाळणीमुळे अनेक कुटुंब विस्थापित झाली. मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या. अनेक लोक त्यात होरपळले गेले. या कटू स्मृती आता 75 वर्षानंतर मिटायला लागल्या होत्या. दोन्ही समाजामध्ये एकोपा निर्माण होत होता. असे असताना पुन्हा एकदा फाळणीचा दिवस साजरा करुन, फाळणीचे कटू वास्तव अधिक रंजक करुन सांगणे, हा देशात कटुता निर्माण करण्याचा प्रकार असल्याचा आरोप पवारांनी मोदी सरकारवर केला.

- Advertisment -