शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेत्यांची आत्मचिंतन बैठक

अपक्ष आमदारांनी भाजपला मत दिल्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. दरम्यान याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बैठक बोलावले.

Sharad Pawar called meeting of NCP leaders after defeat of Rajya Sabha

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला आलेल्या पराभवावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये राज्यसभा निवडणुकीबाबत आणि विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चा होईल. महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत होण्यामागील कारण काय होतं? तसेच आगामी निवडणुकीत रणनिती आखण्यात येऊ शकते.

राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पराभवावर चिंतन करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीबाबतसुद्धा रणनिती या बैठकीमध्ये आखण्यात येईल.

राज्यसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफूल्ल पटेल विजयी झाले. परंतु शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. भाजपने महाविकास आघाडीला चांगलाच धक्का दिला आहे. अपक्ष आमदारांनी भाजपला मत दिल्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. दरम्यान याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बैठक बोलावले. या बैठकीमध्ये पराभवामागील कारणं जाणून घेण्यात येतील. तसेच त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. शरद पवार या विषयावर स्वतः लक्ष घालून बैठक घेत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं शिवसेनेच्या नेत्यांसोबत चिंतन

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये पराभवावर चिंतन करण्यात आले. या बैठकीला मंत्री अनिल परब आणि मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीत पराभव आणि विधान परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून दोन उमेदवार देण्यात आले होते. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विजय झाला तर संजय पवार यांचा पराभव झाला आहे.


हेही वाचा : काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन नसून तो भाजपविरोधातील संताप….संजय राऊत