घरताज्या घडामोडीCycloneNisarga : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

CycloneNisarga : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Subscribe

आज कोकणातील नुकसानी बाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून कोकणवासीयांना मदत करण्यासाठी कोणते पाऊल उचलता येईल, यावर चर्चा झाली.

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना मोठा फटका बसला. पडलेली घरे, प्रार्थना स्थळे, मंदिर, मशिदी, शेती, बागा इत्यादींचे नुकसान झाले आहे. सध्या कोरोनामुळे संपूर्ण देश लढत असताना त्यात चक्रीवादळाचे संकट ओढवले जाते. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना भेट दिली. तसेच आज कोकणातील नुकसानी बाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून कोकणवासीयांना मदत करण्यासाठी कोणते पाऊल उचलता येईल, यावर चर्चा झाली. याशिवाय, शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार, असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनामुळे कोकणातील पर्यटनाला नुकसान झाले. वादळामुळे फळबाग नुकसान झाली याला कशी मदत देता येईल यावर बैठकीत चर्चा झाली. आमच्या घराची कौल उडाली. पत्रे उडाले. पिण्याचे पाणी नाही, वीज नाही, शेती जमीनदोस्त झाली. नारळाची झाडे पडली. घरांची पडझड झाली. घरांची डागडुजी करायची तर पैसे नाहीत. बँका बंद आहेत. राष्ट्रीय बँका बंद आहेत. बँकेत जाण्यासाठी महाडला जावे लागते. तिथपर्यंत जाण्यासाठी पैसे नाहीत, अशी व्यथा कोकणवासी मांडत आहेत.

आधीच कोरोनाचे संकट त्यातच वादळ यामुळे कोकणाला मोठ्या प्रमाणत फटका बसला आहे. त्यामुळे कोकणाला कशी मदत देता येईल यावर चर्चा झाली.
– सुनील तटकरे, खासदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -