घरमहाराष्ट्रशरद पवारांनी ऐन वेळी मतांचा कोटा बदलल्यानं शिवसेनेचे टेन्शन वाढले

शरद पवारांनी ऐन वेळी मतांचा कोटा बदलल्यानं शिवसेनेचे टेन्शन वाढले

Subscribe

शरद पवारांनी आपले पत्ते उघड केलेले नव्हते. आता प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहाखातर शरद पवारांनी मतांचा कोटा बदलून 42 वरून 44 केल्याचं सांगितलं जात आहे

मुंबईः महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला म्हणजेच आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना दोन, राष्ट्रवादी एक, काँग्रेस एक आणि भाजपने तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं सातवा उमेदवार दिल्यानं घोडेबाजार होणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मतांचा कोटा बदलून 42 वरून 44 केला आहे. कारण अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची दोन मत फुकट गेल्यास प्रफुल्ल पटेलांच्या उमेदवारीलाही धोका निर्माण होऊ शकतो. (Sharad Pawar changed the quota of votes for Rajya Sabha elections)

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे मतांचा कोटा 44 करण्यासाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच आग्रही होते. पण त्यावेळी शरद पवारांनी आपले पत्ते उघड केलेले नव्हते. आता प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहाखातर शरद पवारांनी मतांचा कोटा बदलून 42 वरून 44 केल्याचं सांगितलं जात आहे. ऐन वेळी शरद पवारांनी मतांचा कोटा बदलल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा प्रचंड संतापलेत. काल रात्री शिवसेनेच्या शिष्टमंडळानं शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर भेट घेतली, यात अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकरांचा समावेश होता. त्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीनं कोटा बदलल्याचं सांगितलं. त्यामुळेच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले असून, निवडणुकीच्या काही तास आधीच आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवारांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री प्रचंड संतापल्याचंही बोललं जातंय. शिवसेनेकडून संजय राऊत आणि कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. राष्ट्रवादीची दोन मतं कमी झाल्यानं संजय पवार यांची जागा धोक्यात येऊ शकते.

- Advertisement -

शिवसेना असो वा भाजप दोन्ही बाजूंकडून राज्यसभा निवडणुकीत आपापले उमेदवार विजय होण्याचा दावा केला जात आहे. मात्र, या विजयासाठी त्यांनाही ठराविक मतांची गरज आहे. महाराष्ट्रात सध्या 287 आमदार राज्यसभेसाठी मतदान करणार असून, सहा उमेदवारांना विजयासाठी प्रत्येकी 42 मतांचा कोटा देण्यात आलेला आहे. विधानसभेत सध्या पक्षीय बलाबल भाजप 106, शिवसेना 55, राष्ट्रवादी 53, काँग्रेस 44, छोटे पक्ष 16, अपक्ष 13 असे संख्याबळ आहे. शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांच्याकडे शिवसेनेची 13, राष्ट्रवादीची 11 आणि काँग्रेसची 2, अशी मिळून 26 मतं अतिरिक्त आहेत. अशा प्रकारे महाविकास आघाडीकडे एकूण 26 मते असून 42 चा आकडा गाठण्यासाठी 16 मतांची गरज आहे. त्यांना विजय निश्चित करण्यासाठी लहान राजकीय पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मतांचीही गरज आहे. तर दुसरीकडे भाजपकडे 22 मते अतिरिक्त आहेत. आता छोटे पक्ष आणि अपक्ष अशी एकूण 29 मते अतिरिक्त असून, या मतांच्या जोरावरच शिवसेनेचा दुसरा किंवा भाजपचा तिसरा उमेदवार विजयी होऊ शकतो. पण ऐन वेळी शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांसाठी जागांचा कोटा बदलल्यानं शिवसेनेच्या उमेदवाराला मिळणारी राष्ट्रवादीची दोन मतं कमी होणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेला अपक्षांची मनधरणी करावी लागणार आहे.

सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेत सहज प्रवेश करतील. मात्र शेवटच्या आणि सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस होणार आहे. दोन्ही पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे ही स्पर्धा खूपच रंजक बनली आहे. त्यातच ऐन वेळी शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांसाठी मतांचा कोटा बदलल्यानं शिवसेनेची एक जागा धोक्यात आली आहे. प्रत्येक प्रमुख पक्ष लहान राजकीय पक्ष आणि अपक्ष आमदारांना आपल्याकडे ओढण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत अपक्षांची मतं निर्णायक ठरणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचाः Rajya Sabha Election : ४ राज्यात १६ जागांवर राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान, कोण मारणार बाजी?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -