घरमहाराष्ट्रनाशिकनागालँडमध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला नाही, पवारांचा पुनरुच्चार

नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला नाही, पवारांचा पुनरुच्चार

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर आता स्वतः शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँडमध्ये सरकारला पाठींबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सात आमदार नागालँडमध्ये निवडून आले आहेत. पवार यांनी पत्रकार परिषद घेत नागालँडमध्ये हा पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली. एकेकाळी कट्टर विरोधक मानले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणार असल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर आता स्वतः शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय.

शरद पवार नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. “नागालॅंडमध्ये भाजपाला पाठिंबा दिला असं नाही. तर तिथल्या मुख्यमंत्र्यांना ऐक्याच्या दृष्टीने सहकार्य करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.” असं शरद पवार यावेळी म्हणाले. यापुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, नागालॅंडमध्ये नागा समाजाचे काही प्रश्न आहेत. त्यामुळे सगळ्यांना एकत्र एकत्र आणण्यासाठी तेथील मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. नागालॅंडमधील मुख्यमंत्री हे भाजपचे नाहीत. तिथे कोणताच पक्ष हा सत्तेबाहेर नाही. नागालॅंडमध्ये ७ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिंकली आहे. त्यामुळे तिथल्या लोकप्रतिनिधींनी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतू तिथल्या नागा समाजातील ऐक्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडून जी पावले उचलली गेली आहेत, त्याला सहकार्य करण्यासाठी राष्ट्रवादीने तिथल्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलाय.” असं देखील शरद पवारांनी स्पष्ट केलंय.

- Advertisement -

यावेळी शरद पवारांनी राज्यातील कांदा प्रश्नी आपली भूमिका मांडली. नाफेडमधून अद्यापही कांदा खेरदी सुरू झालेली नाही. शासकीय संस्थानी कांदा खरेदी केला पाहिजे. अवकाळीचा फटका इतर पिकांनाही बसलाय. त्यामुळे सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी देखील केलंय. तसंच राज्यात सुरू असलेला कांदा प्रश्न राज्यसभेत मांडणार असल्याचं देखील शरद पवारांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -