घरताज्या घडामोडीसावरकरांचा दृष्टीकोन वैज्ञानिक होता, शरद पवार यांचे मोठं वक्तव्य

सावरकरांचा दृष्टीकोन वैज्ञानिक होता, शरद पवार यांचे मोठं वक्तव्य

Subscribe

सावरकरांचा दृष्टिकोन वैज्ञानिक होता. त्यांनी मंदिर बांधले आणि त्याचे विधी करण्यासाठी दलित पुजारी नेमले यामधून सावरकर वैज्ञानिक दृष्टीकोनाचे होते हे दिसून येते असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. तसेच सावरकरांनी गाईचे मांस आणि दुधाच्या उपयुक्ततेचा देखील पुरस्कार केला आहे. सावकरांनी स्वातंत्र्य चळवळीत जे योगदान दिलं आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकरांबाबत भाष्य केलं आहे. सावरकरांवर होत असलेल्या विधानांवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. रविवारी शरद पवार यांनी सावकरांच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, सावरकरांबद्दल भाजपकडून विनाकारण वाद निर्माण करण्यात आला आहे. सावरकरांनी रत्नागिरीमध्ये एक छोटं मंदिर बांधले आणि त्याच्या विधी करण्यासाठी दलित पुजारी नेमले होते. त्या काळी दलितांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता यामुळे समाजिक समतेचा संदेश देण्यासाठी सावरकर यांनी मंदिर बांधले आणि त्याच्या विधी दलित पुजारींकडून करुन घेतली. यामुळे सावरकरांचा दृष्टीकोन वैज्ञानिक होता हे दिसून येते असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस सावरकर यांचा आदर करतो. सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीत जे योगदान दिलं आहे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. साहित्य संमेलनातून सावरकरांचे नाव वगळण्यात आल्यामुळे फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरुन भाजपच्या लोकांकडून विनाकारण वाद तयार करण्यात येत असल्याचा शरद पवार म्हणाले.


हेही वाचा :  मराठी साहित्य संमेलनात मांडले गेले ‘हे’ १३ ठराव

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -