घरमहाराष्ट्रशुक्राचार्यांना बाजुला करा, मी हवी ती मदत करतो, शरद पवारांचा मधुकर पिचडांना...

शुक्राचार्यांना बाजुला करा, मी हवी ती मदत करतो, शरद पवारांचा मधुकर पिचडांना टोला

Subscribe

राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही

अहमदनगरमधील सर्व नेते विधानसभा निवडणुकीच्यावेळी एकजुटीने सोबत आले. अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करताना आम्हाला साथ दिली. तशीच साथ यापुढेही द्यावी. माजी आमदार कै. यशवंत भांगरे हे माझ्या अगोदर ५ वर्षे विधानसभेत होते. ते मला जेष्ठ होते. अकोले तालुक्यातील अनेक महत्वाच्या संस्था उभारणीत भांगरे यांचा मोठा सहभाग होता अशी आठवण शरद पवार यांनी बोलून दाखवली. कै. यशवंत भंगारे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. अहमदनगर दौऱ्यादरम्यान त्यांनी आपले जुने सहकारी मधुकर पिचड यांचा चांगलाच समाचार घेतला. एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागल आहे. मी सर्व गोष्टी केल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक अशा मधुकर पिचड यांच्या मुलाने म्हणजे वैभव पिचड याने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजप प्रवेश केला. या निवडणुकीत वैभव पिचड यांचा किरण लहामटे यांनी पराभव केला होता.

विधानसभेच्या वेळची अकोल्यातील आठवण सांगताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला अकोल्यात सभा घेतली तेव्हाच मला जनतेच्या मनातल कळाल होतं. जनतेला जे परिवतर्न अपेक्षित होते ते झाले आहे. अकोल्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या कर्जाच्या विषयाच्या निमित्तानेही त्यांनी मधुकर पिचड यांना नाव न घेता टोला लगावला. कारखान्याच्या २०० कोटीच्या कर्जासाठी जबाबदार असणाऱ्या शुक्राचार्यांना बाजुला करा, मी कारखाना चालवण्यासाठी सर्व ती मदत करतो, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तालुक्यातील जनतेला जी आश्वासने दिली आहेत, ती पुर्ण करा असा सल्ला शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना दिला. ही आश्वासने पुर्ण करण्यात काही अडचणी असल्यास मला सांगा असेही ते म्हणाले.

- Advertisement -

लोणी ते भंडारदरा सायकलवर आल्याची आठवण

भंडारदरा आणि अकोले भाग इको सेन्सेटीव्ह झोन झाला आहे. त्यामुळे याठिकाणी विकासाला अनेक मर्यादा येतील. पण भंडारदरा आणि अकोले भागातील लोकांना दुर्लक्षित करू नका, असा सल्लाही त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. पर्यावरणाचे रक्षण करतानाच स्थानिक नागरिकांशी समन्वय साधणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. भंडारदरा मला आवडणारा परिसर आहे. शालेय जीवनात ९ वीत असताना सायकलवर मी रंधाफॉल बघण्यासाठी लोणी ते भंडारदरा आलो होतो ही आठवण त्यांनी यावेळी सांगितली.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -