पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्याला मिळाले, शरद पवारांची खोचक टीका

Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपालांना अधिक कष्टदायी काम असल्यामुळे त्यांनी वर्षभर अध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला नव्हता. पण हे सरकार आल्यानंतर ४८ तासांत तोच निर्णय घेण्यात आला. पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्यपाल मिळाले, पण हे राज्यपाल, अशा शब्दांत शरद पवारांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

मध्यावधी निवडणूक होईल असं म्हणालो नव्हतो

पुढील निवडणुकीसाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. त्या अनुषंगाने आपण पक्षातील नेत्यांना निवडणुकीसाठी तयारी लागण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, आपण मध्यावधी निवडणूक होईल असं म्हणालो नव्हतो, असं शरद पवार म्हणाले.

औरंगाबादचं नाव बदलण्याचा मुद्दा नव्हता

किमान समान कार्यक्रमात औरंगाबादचं नाव बदलण्याचा मुद्दा नव्हता. पण जेव्हा निर्णय झाला त्यानंतर आम्हाला हे सांगितलं गेलं. एकदा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री यांचा निर्णय अंतिम असतो. नाव बदलण्याचा मुद्द्यावर मतं व्यक्त केली गेली. पण हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अंतिम निर्णय म्हणून घेतलाय. औरंगाबादच्या दृष्टीने इतर महत्वाच्या गोष्टी केल्या असत्या तर चांगलं झालं असतं, असं पवार म्हणाले.

महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढाव्यात

यापूर्वी बंड झाले तेव्हा परिस्थिती वेगळी असायची. पण यावेळी शिवसेनेनं त्यात लक्ष घातलेलं दिसत नाही. न्यायालयाच्या निर्णयावरही पवारांनी भाष्य केलं. न्यायपालिकेवर आपला विश्वास असल्याचं देखील पवारांनी म्हटलं आहे. पुढील काळात येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा आहे. मात्र हे निर्णय बसून चर्चेतून घ्यावे लागतील, असंही पवार म्हणाले.


हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी आम्हाला बोलावलं तर नक्की जाऊ – आमदार संतोष बांगर