घरमहाराष्ट्र"राज्यपालांची नियुक्ती चुकीची...", शरद पवारांची भगतसिंह कोश्यारींवर टीका

“राज्यपालांची नियुक्ती चुकीची…”, शरद पवारांची भगतसिंह कोश्यारींवर टीका

Subscribe

राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावायला नको होती. कारण राज्यपालांकडे त्यावेळी बहुमत चाचणीसाठीचे पुरेसे कारण नव्हते, अशी कानउघाडणी सर्वोच्च न्यायालयाने केली.

मुंबई | “राज्यपालांची नियुक्ती चुकीचीच, कोश्यारी हे उत्तम उदाहरण महाराष्ट्रांनी पाहिलेले आहे”, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. यानंतर शरद पवार आणि नितीश कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

राज्यातील सत्तासंघर्ष निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहे, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “राज्यपालांची निवड किती चुकीची केली, याचे कोश्यारी हे उत्तम उदारहण महाराष्ट्रांनी पाहिलेले आहे.” शरद पवार पुढे म्हणाले, “राज्यपालांना जे करायचे होते, त्यांनी केले आहे. कोश्यारींनी सर्व गोष्टींकडे दुर्लक्षकरून कारभार करत होता. यामुळे कोश्यारींचे नाव लोकांच्या लक्षात राहील.”

- Advertisement -

 

हेही वाचा – राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे; सर्वोच्च न्यायालयाचं मोठं निरीक्षण

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालय नेमके काय म्हणाले

राज्यपालांचे सर्व निर्णय चुकल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने १६ आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या निकालाचे आज, ११ मे रोजी वाचन केले. त्यात राज्यरपालांच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेण्यात आला. राज्यपालांनी कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणे हे चुकीचे आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावायला नको होती. कारण राज्यपालांकडे त्यावेळी बहुमत चाचणीसाठीचे पुरेसे कारण नव्हते, अशी कानउघाडणी सर्वोच्च न्यायालयाने केली. न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -