Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश काँग्रेसची सद्यस्थिती दूरवस्थेतल्या हवेलीच्या जमीनदारासारखी : शरद पवार

काँग्रेसची सद्यस्थिती दूरवस्थेतल्या हवेलीच्या जमीनदारासारखी : शरद पवार

प्रशांत किशोरची मला गरज नाही असे सांगतानाच भविष्यातली राजकीय मोर्चेबांधणीवरही केले भाष्य

Related Story

- Advertisement -

काँग्रेसची सद्यस्थिती ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. दूरवस्था झालेल्या हवेलीचा जमीनदार समोर बघतो आणि सांगतो की हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं. काहीशी तशीच अवस्था काँग्रेसची झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या दुबळेपणावर भाष्य केलं.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्य आणि देशभरातल्या राजकीय परिस्थितीवर मत व्यक्त केलं. त्यात ते काँग्रेसच्या सद्यस्थितीवरही बोलले. काँग्रेसची आज दूरवस्था झाली आहे, असं असलं तरी आजही हा रिलेवन्स असलेला पक्ष आहे. देशभरात त्याचा विस्तार आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. आज काँग्रेसकडे केवळ ४० जागा आहेत.

- Advertisement -

विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदावर कुणी बसावं यावरुन मतभेद आहेत. काँग्रेची नेतेमंडळी राहुल गांधी यांच्यात तो चेहरा पाहताहेत. यावर पवारांनी सांगितलं की, काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात.

मला सत्तेत बसण्याची महत्त्वाकांक्षा नाही

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी मोर्चेबांधणी करताहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यावर पवार म्हणाले की, मला प्रशांत किशोर यांची मदत घ्यायची कोणतीच गरज नाही. तसंच, सध्या मला सत्तेत बसण्याचीही महत्त्वाकांक्षा नाही. मात्र, विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचं राजकारण घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन.

- Advertisement -