घर महाराष्ट्र NCP : ज्या लोकांच्या हाती सत्ता, त्यांनीच...; शरद पवारांची भाजपवर सडकून टीका

NCP : ज्या लोकांच्या हाती सत्ता, त्यांनीच…; शरद पवारांची भाजपवर सडकून टीका

Subscribe

शरद पवार यांनी भाषणातून भाजपवर सडकून टीका केली. ज्या लोकांच्या हातात देशाची सत्ता आहे, तेच देशात असंतोष पसरवण्याचे काम करत आहेत, असा घणाघात शरद पवार यांनी केला.

दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावळी पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी शरद पवार यांनी देखील पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. पण या भाषणातून पवारांनी भाजपवर सडकून टीका केली. ज्या लोकांच्या हातात देशाची सत्ता आहे, तेच देशात असंतोष पसरवण्याचे काम करत आहेत, असा घणाघात शरद पवार यांनी केला.

हेही वाचा – Ajit Pawar यांना डावललं? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

- Advertisement -

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मागच्या 24 वर्षात वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना राष्ट्रवादी पक्षाने केला. शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला आहे. नागालँड सारख्या महत्त्वपूर्ण राज्यात पक्षाचे सात लोक निवडून दिले. तिथे त्यांनी भाजपचा पराभव केला, ह्याचा आनंद आहे. त्यांचे अभिनंदन करणे हे माझे कर्तव्य आहे, असे म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्या लोकांच्या हातात देशाची सत्ता आहे. तेच देशात असंतोषाचे वातावरण निर्माण करत आहेत. एक दिवस असा नाही जात की, देशातील कोपऱ्यात अत्याचाराच्या घटना घडत नाहीयेत. हातात सत्ता आल्यानंतर त्याचा गैरवापर कसा करावा हे त्यांनी दाखवून दिले आहे. दररोज देशात महिलांवर, मुलींवर, लहान मुलांवर अत्याचार होत आहेत, असेही शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. देशात एकीकडे शेतकऱ्यांना चांगली किंमत देण्याची गोष्ट करण्यात येतात, पण दुसरीकडे मात्र कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी संकटात आहे, असे म्हणत पवारांनी काळजी व्यक्त केली.

तसेच, बेरोजगारी ही देशातील सध्या सर्वात मोठी समस्या आहे. तरुण वर्ग या समस्येमुळे हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता सगळ्यांना कळून चुकले आहे की यांची सत्ता आमच्या कामाची नाही. त्यांच्याकडून फक्त आश्वासने देण्यात येत आहे हे लोकांच्या लक्षात आल्याने बदलाला सुरुवात झाली आहे. देशातील अनेक राज्यात नागरिकांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले आहे, असेही पवार म्हणाले

अनेक राज्यात आमदारांना चोरून, त्यांना पैशांचे आमिष देवून सत्ता आणण्याचे काम केले आहे. त्यामुळे सत्तेचे मूल्ये न जपणाऱ्यांना राजकारण्यांना नागरिकांना आणि आपल्याला मिळून धडा शिकवायची आहे. त्यामुळे देशातील विविध विचार असणाऱ्या लोकांना एकत्र येण्याची आज गरज आहे. आपण सगळ्यांनी मिळून काम करून देशात बदल घडवून आणायचा आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

- Advertisment -