Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र जळगावच्या सभेमधून शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका, म्हणाले...

जळगावच्या सभेमधून शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका, म्हणाले…

Subscribe

शरद पवार यांनी पुन्हा एकदा त्यांनी उत्तर महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला असून आज (ता. 05 सप्टेंबर) जळगावमध्ये त्यांची चौथी सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.

जळगाव : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाची मोर्चेबांधणी करण्यास नव्याने सुरुवात केली आहे. पक्षाची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात शरद पवारांनी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातून केली. येवला हा राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले आणि अजित पवार यांच्या गटातील नेते, आमदार छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे शरद पवारांनी येवल्यातून आपल्या जाहीर सभांना सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. पवारांच्या आत्तापर्यंत तीन सभा झाल्या आहेत. येवल्यानंतर त्यांनी बीड आणि कोल्हापुरात सभा घेतली. आता पुन्हा एकदा त्यांनी उत्तर महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला असून आज (ता. 05 सप्टेंबर) जळगावमध्ये त्यांची चौथी सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. (Sharad Pawar criticizes PM Narendra Modi in Jalgaon meeting)

हेही वाचा – जालन्याच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर, म्हणाले – “…तर तुम्हाला…”

- Advertisement -

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, सध्या देशात नरेंद्र मोदींचे राज्य आहे. त्यांना सत्तेत येऊन नऊ वर्षे झाली, या काळात मोदींनी काय केले? त्यांनी फक्त इतर राजकीय पक्षांना फोडण्याचे काम केले. त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे फोडाफोडीचे राजकारण. त्याचबरोबर त्यांनी लोकांनी त्यांच्या हातात दिलेली सत्ता लोकांसाठी वापरण्याऐवजी त्यांनी लोकांवर सीबीआय, ईडीच्या माध्यमातून खोटे खटले दाखल करण्याचे काम केले. याचा उल्लेख अनिल देशमुखांनीही केला. काहीही संबंध नसताना आमच्या एका महत्त्वाच्या सहकाऱ्याला काही महिने तुरुंगात टाकायचे काम त्यांनी केले. नवाब मलिकांनाही तुरुंगात टाकले. अनेकांना तुरुंगात टाकले. लोकांनी दिलेली सत्ता लोकांना सन्मानाने जगता येईल, यासाठी वापरण्याऐवजी भाजपाने सत्तेचा गैरवापर केला, अशी टीका पवारांकडून करण्यात आली.

तसेच, देशाचे पंतप्रधान मोदी भोपाळला गेले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका-टिप्पणी केली. त्यांनी सांगितले की, हे भ्रष्ट लोक आहे. आमच्याकडे अनेकांची माहिती आहे. माझे मोदीसाहेबांना नम्रतेने एकच सांगणे आहे, जर कुणी चुकीचे काम केले असेल तर त्यांच्याविरुद्ध खटला भरा. चौकशी करा. पण तुमचे आरोप खोटे ठरले तर तुम्ही स्वत:ला काय शिक्षा देणार? हेही संपूर्ण देशाला सांगा. खोटे आरोप करणे हे देशाच्या हिताचे नाही, असे म्हणत एक प्रकारचे आव्हानच शरद पवारांकडून मोदींना करण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -