घरताज्या घडामोडीAssembly Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात निवडणूक लढणार, शरद पवारांची...

Assembly Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात निवडणूक लढणार, शरद पवारांची घोषणा

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये देशातील पाच राज्यांपैकी तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार आहे. त्यामध्ये मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार आहे. यासंदर्भातील घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पवारांनी ही घोषणा केली. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षासोबत आघाडी करणार याबाबतची माहितीही त्यांनी यावेळी दिली. काही राज्यांमध्ये बैठका सुरू असून कोणत्या पक्षासोबत कशा पद्धतीने युती करता येईल यासाठीच्या काही बैठका झाल्याचेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस कुठे किती जागा लढवणार ?

देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी ३ राज्यांमध्ये निवडणूक लढणार आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढणार आहेत. तर माणिपूरमध्ये ५ जागांवर आम्ही लढणार आहोत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

- Advertisement -

एकत्र लढण्यासाठी चर्चा करणार

गोव्यामध्ये काँग्रेस तृणमूल काँग्रेस सोबत एकत्र लढण्याच्या विचारात होतो. त्याबाबतची एकत्रित लढण्याची चर्चा सध्या सुरू आहे. गोव्यात एकत्र येण्याची चर्चा झाली खरी, पण काँग्रेसचे धोरण माहीत नाही. गोव्यात शिवसेनेकडून राऊत, राष्ट्रवादी कडून प्रफुल पटेल आणि काँग्रेसकडून तेथील जे कोणी असतील ते असं तिघांनी मिळून चर्चा करण्याचे आम्ही ठरवले आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि इतर छोट्या छोट्या पक्षांस्पबत युती करण्याचे ठरवले आहे. या युतीबाबतची बुधवारी बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते या बैठकीसाठी तिथे जाणार आहेत. लखनऊ मध्ये कोणाच्या वाट्याला किती जागा याची घोषणा करणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

- Advertisement -

उत्तर प्रदेशची जनता नक्कीच कौल देईल

आमच्याबाजुने ८० टक्के लोक आहेत तर २० टक्के लोक नाहीत असे विधान उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री हा सर्वांचा असतो. २० टक्के लोक बाजुने नाहीत हे विधान अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या भावनांना छेद देणारे आहे. अशाप्रकारचे विधान मुख्यमंत्रीपदाला शोभा देणारे नाही. पण त्यांच्या जे मनात आहे, ते त्यांच्या ओठावर आले आहे. यातून एक गोष्ट सिद्ध होते की, देशात एकता आणि सहिष्णुता टिकवायची असेल तर अशाप्रकारचे सांप्रदायिक विचार वाढणे योग्य नाही. याविरोधात उत्तरप्रदेशची जनता नक्कीच कौल देईल आणि राज्यात परिवर्तन घडवेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

गोव्यात भाजपचे सरकार हटवण्याची गरज आहे आणि तसे एकत्रित पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे अशी आमची इच्छा आहे. माझ्या पक्षाकडून प्रफुल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत व कॉंग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू आहे असेही शरद पवार म्हणाले.

सिराज मेहंदी यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश 

दरम्यान आज उत्तरप्रदेशमधील कॉंग्रेसचे अल्पसंख्याक नेते सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत आदरणीय शरद पवार यांनी केले. आज उत्तरप्रदेशच्या स्थितीमध्ये खूप बदल झाला आहे. मला आनंद आहे की, जे उत्तरप्रदेशच्या विधानपरिषदेचे सदस्य होते. मागच्या अनेक वर्षांपासून गांधी-नेहरू यांच्या विचारधारेवर काम केले आहे. काँग्रेस पक्षात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आता राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांना सोबत घेऊन उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन एक अल्टरनेटीव्ह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिराज मेहंदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत याचा मला आनंद होत आहे. उत्तरप्रदेशच्या अनेक जिल्ह्यात त्यांचे सहकारी आहेत.मी देखील उत्तरप्रदेशमध्ये जाऊन त्यांच्यासोबत एक जाहीर सभा घेणार आहे असेही शरद पवार यांनी जाहीर केले.

आज उत्तरप्रदेशचे मंत्री मौर्या यांनी मंत्रिपदाचा तसेच भाजपचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षाची कास धरली आहे. त्यांच्यासोबत काही आमदारही पक्ष सोडणार असल्याचे कळते त्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये यावेळी परिवर्तन होणार आहे असे ठाम मत शरद पवार यांनी व्यक्त केले. उत्तरप्रदेशच्या जनतेला जी आश्वासने देण्यात आली होती. त्यात सत्यता नाही, त्यामुळे अनेक लोक भाजप सोडून परिवर्तन घडवण्यासाठी येत आहेत हे आता लोकांना कळले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -