घरमहाराष्ट्रपवारांकडे या नाकर्त्या सरकारचा बचाव करण्याचे कामं; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

पवारांकडे या नाकर्त्या सरकारचा बचाव करण्याचे कामं; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Subscribe

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे शरद पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बचाव करावा लागत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. सध्या शरद पवार यांना दररोज सरकारचा बचाव करावा लागत आहे. कारण, या सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. अतिवृष्टीनंतर अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री मुंबईतच बसून होते. आमचे दौरे जाहीर झाल्यानंतर हे सर्व पालकमंत्री मुंबईवरून आपापल्या मतदारसंघात परतले, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला ते बचाव करत असल्याचे विरोधक सातत्याने म्हणत आहेत.

कोरोनाचे संकट असो वा शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होत असते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज, सोमवारी तुळजापुरातील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. प्रशासकीय निर्णय वेगाने घेण्यासाठी आम्हीच मुख्यमंत्र्यांना मुंबईत थांबायला सांगितले आहे. कोरोना संकटाच्या काळात आम्हीच मुख्यमंत्र्यांना तुम्ही एका ठिकाणी बसा, आम्ही सर्वजण फिरु, अशी विनंतीही आम्ही त्यांना केली होती. ज्यांच्या हातात प्रशासनाची जबाबदारी असते त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यासाठी त्यांना कार्यालयात थांबावे लागते. माझ्या हातात प्रशासकीय जबाबदारी नाही. मला स्वस्थ बसवत नाही, त्यामुळे मी फिरत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

अमित ठाकरे कोरोना निगेटीव्ह, राज ठाकरे पोहचले लिलावतीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -