घरताज्या घडामोडीpetrol diesel price: इंधन दर कपातीसाठी केंद्राने राज्याचा जीएसटी परतावा द्यावा, शरद...

petrol diesel price: इंधन दर कपातीसाठी केंद्राने राज्याचा जीएसटी परतावा द्यावा, शरद पवारांची मागणी

Subscribe

केंद्र सरकारने देशातील पेट्रोल डिझेलचे दर कपात केले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर भाजपशासित राज्यांमध्ये देखील पेट्रोल डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये पेट्रोल डिझेल १२ ते १७ रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने अद्याप व्हॅटमध्ये कपात केली नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला नाही. यावरुन चांगलेच राजकारण पेटलं आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र जीएसटी परताव्याचे उर्वरित रक्कम दिल्यास इंधनावरचा कर कमी करता येईल असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपला झटका बसला असल्यामुळे इंधनाचे दर कपात करण्यात आले असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिवाळीभेट कार्यक्रमाला बारामतीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्राने पेट्रोलचे दर ५ रुपये तर डिझेलचे दर १० रुपयांनी कमी केले आहेत. तसाच राज्यातील सरकारने कर कपात केल्यावर नागरिकांना दिलासा मिळू शकतो असा प्रश्न पवारांना केला यावर त्यांनी भाष्य केलं आहे. राज्याने दिलासा देऊ असे म्हटलं आहे. परंतु केंद्र सरकारने राज्याचे जीएसटी परताव्याची रक्कम दिली नाही ते केंद्र सरकारने लवकर दिले तर राज्य सरकारला लोकांना दिलासा देण्यासारखा निर्णय घेता येईल असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

काही लोकांनी टोकाची भूमिका घेतल्याने एसटी संप

शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर देखील भाष्य केलं आहे. शरद पवार म्हणाले, एसटी संघटनेतील प्रमुख व्यक्तींनी माझी भेट घेतली. त्यांनी सांगितले हा संप त्यांना पुढे न्यायचा नाही परंतु काही लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे संप सुरु आहे. राज्यात ८० ते ८५ टक्के एसटी रस्त्यावर धावत आहेत फक्त १५ टक्के एसटी कर्मचारी संपावर आहेत. शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे की, संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी हे योग्य ठरणार नाही. कोर्टाने देखील हा संप कायदेशीर नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोर्टाच्या निष्कर्षाचा आदर ठेवून हा विषय संपवावा असं शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : Corona : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, ५ व्यक्तींना कोरोनाची लागण

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -