घरमहाराष्ट्रपुणेशरद पवार-दिलीप वळसे पाटील यांची 'मोदीबागे'त भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

शरद पवार-दिलीप वळसे पाटील यांची ‘मोदीबागे’त भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Subscribe

बारामती : अजित पवार गटाचे नेते आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दिलीप वळसे पाटील हे दिवाळी निमित्ताने शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी मोदीबाग येथे गेल्याची माहिती मिळाली आहे. पण दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान नेमके काय चर्चा झाली. यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढण्यास सुरुवात झाली आहे.

दरवर्षी दिवाळी निमित्ताने संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते शरद पवारांच्या निवासस्थानी मोदीबागमध्ये एकत्र येतात. पण अजित पवारांनी पक्षासोबत बंड करत शिंदे-फडणवीस सरकारशी हात मिळवणी करत सरकारमध्ये सामील झाले. यावेळी अजित पवार यांच्यासह 9 आमदार देखील सरकारमध्ये सामील झाले. दिवाळी निमित्ताने अजित पवार गट आणि शरद पवार यांच्यातील मतभेद बाजूला ठेवले जातील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. राज्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या मतदार संघातील ग्रामपंचायती पराभव झाला. यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो.

- Advertisement -

हेही वाचा – भारताविरुद्ध तरुणांची फौज उभी करणारा ‘लष्कर’चा दहशतवादी ठार; हाफिज सईदला मोठा धक्का

पी. ए म्हणून कारकिर्दीला सुरुवात

दिलीप वळसे पाटील यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही शरद पवार यांच्या पी.ए म्हणून झाली होती. यानंतर शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांना आमदारकीची तिकीट दिले. यानंतर दिलीप वळसे पाटील हे मंत्रीमंडळात 20 ते 22 वर्षे आहे. पक्षात फुट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्या गटात केले आहे. यामुळे दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीमागचे कारण अद्यापही कळू शकले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -