घरताज्या घडामोडीजातीवाचक बोलणाऱ्या नेत्यांना समज दिलीये; शरद पवारांचे ब्राम्हण संघटनांना आश्वासन

जातीवाचक बोलणाऱ्या नेत्यांना समज दिलीये; शरद पवारांचे ब्राम्हण संघटनांना आश्वासन

Subscribe

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी ब्राम्हण नेत्यांनी आज भेट घेतली. या भेटीत ब्राम्हण नेत्यांनी समाजाच्या मागण्या मांडल्या. ब्राम्हण समाजाच्या (Brahmin) प्रमुख चार मागण्या होत्या. यापैकी सरकार विषयी तर काही राष्ट्रवादी कॉंग्रेस संदर्भात होत्या. ब्राम्हणांच्या जा मागण्या राष्ट्रवादी संदर्भात होत्या. त्या मागण्यांवर शरद पवारांनी आपली भूमीका स्पष्ट केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी ब्राम्हण नेत्यांनी आज भेट घेतली. या भेटीत ब्राम्हण नेत्यांनी समाजाच्या मागण्या मांडल्या. ब्राम्हण समाजाच्या (Brahmin) प्रमुख चार मागण्या होत्या. यापैकी सरकार विषयी तर काही राष्ट्रवादी कॉंग्रेस संदर्भात होत्या. ब्राम्हणांच्या जा मागण्या राष्ट्रवादी संदर्भात होत्या. त्या मागण्यांवर शरद पवारांनी आपली भूमीका स्पष्ट केली. त्याचप्रमाणे ब्राम्हणांनी आरक्षणाबाबतही मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर शरद पवारांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. उर्वरीत मागण्या या महामंडळ आणि सरकार संदर्भात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा घडवून आणतो असे सांगितले. त्यामुळे आता सरकार संदर्भातील ब्राम्हण समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक प्रतिसाद देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ब्राम्हण नेत्यांनी शरद पवारांसोबत भेट घेत राष्ट्रवादीचे नेते ब्राम्हण समाजावर टीका करतात असल्याची तक्रार केली. त्यांच्या या तक्रारीनंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आमच्या पक्षाची बैठक झाल्याचे सांगितले. तसेच, या बैठकीत जाती धर्माविरोधात बोलू नये, धोरणच्या संदर्भात बोलावे, असे नेत्यांना सांगितले आहे. हा विषय संपवावा असेही मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले आहे. शिवाय जे नेते समजावर टीका करतात. त्यांना समजही देण्यात आल्याचे पवारांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – संभाजीराजेंबाबत शरद पवारांचे भाजपावर गंभीर आरोप

ब्राह्मण संघटनांची आरक्षणाची मागणी

- Advertisement -

या तक्रारीनंतर बैठकीमध्ये ब्राह्मण संघटनांनी आरक्षणाची मागणी केल्याचे शरद पवार म्हणाले. त्यावेळी “अलिकडच्या काळात ग्रामीण भागातला हा वर्ग नागरी भागात येतोय. त्यामुळे नोकरीमध्ये त्यांना अधिक संधी मिळावी. यासाठी आरक्षणाची गरज असल्याची मागणी ब्राह्मण समाजाने केली. त्यावेळी त्यांना आरक्षणाचे सूत्र समजावून सांगितले. पण इतरांच्या आरक्षणाला विरोध करु नये, असे मी आवाहन केलं.”, असे पवार म्हणाले.

हेही वाचा – राज्यसभेसाठी शरद पवारांचा संभाजी राजेंना पाठिंबा

परशुराम महामंडळ

विविध समाजासाठी विकासाला, व्यवसायाला मदत करण्यासाठी महामंडळ स्थापण करावे अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी परशुराम महामंडळ असो नावही सूचवण्यात आले. तेव्हा हा विषय आपल्या अधिकारात नाही, तो राज्याकडे आहे. आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत ब्राह्मण समाजाची बैठक घडवू असे आश्वासन दिले.

या बैठकीला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, जागतिक ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष अजित घाटपांडे, समस्त ब्राम्हण समाजाचे काकासाहेब कुलकर्णी, चित्पावन ब्राम्हण संघाचे अध्यक्ष गाडगीळ गुरुजी,
आम्ही सारे ब्राम्हण संघटनेचे भालचंद्र कुलकर्णी, ब्राम्हण महासभेचे प्रकाश दाते, समर्थ मराठी संस्थेचे अनिल गोरे, ॲमोनोरा टाऊनशी आणि सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.


हेही वाचा – Good News : मोदी सरकारचा मोठा दिलासा! पेट्रोल ९.५० पैसे, डिझेल लीटरमागे ७ रु. होणार स्वस्त

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -