घरमहाराष्ट्रSharad Pawar : विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडीची कारवाई; शरद पवारांनी आकडेच केले...

Sharad Pawar : विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडीची कारवाई; शरद पवारांनी आकडेच केले जाहीर

Subscribe

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपाकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू असून, विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. अगोदर लोकांना ईडी काय आहे, हे माहिती नव्हतं. भाजपा सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत 121 नेत्यांवर कारवाई करण्यात आली.

पुणे : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आज पुण्यात आयोजित पक्षाच्या मेळाव्यात केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. केंद्र सरकारकडून फक्त विरोधी पक्षातीलच नेत्यांवर कारवाई केली जाते म्हणतच ईडीच्या कारवाईची आकडेवारीच जाहीर केली. त्यांच्या या टीकेनंतर भाजपकडून त्यांना कसे उत्तर मिळते हे पहावे लागणार आहे. (Sharad Pawar ED action against opposition party leaders only Sharad Pawar announced the figures)

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपाकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू असून, विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. अगोदर लोकांना ईडी काय आहे, हे माहिती नव्हतं. भाजपा सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत 121 नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे सरकार असणाऱ्या राज्यांतील 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार यांचा समावेश आहे, याचा काय अर्थ काढायचा? असा सवाल शरद पवार यांनी केला.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींना साध्य काय कराचं?

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, काल लोकसभेचं कामकाज संपलं. पंतप्रधानांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला समजेल की, त्यांनी काहीही विधायक सांगितले नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राज्यसभेत भाषण केले होते. त्यावेळीही त्यांनी इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचं राहणं यावरच भाष्य केलं. नेहरुंनी लोकशाही रुजवली, लोकशाहीचं शासन दिलं, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले मोदी यांनी केले. मला समजत नाही की त्याने काय साध्य होणार आहे. ज्यांनी देशाला दिशा दिली, देशासाठी कष्ट केले त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करणे हे शहाणपणाचं लक्षण नाही,” असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

हेही वाचा : Akola Crime News : अकोल्यात खळबळ; जिल्हा परिषद शाळेच्या छतावर नवजात अर्भकांचे मृतदेह?

- Advertisement -

फक्त 25 खटले सत्य, उर्वरित गुन्ह्यांचं काय?

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, ईडीचा गैरवापर फार झाला. 2005 ते 2023 या 18 वर्षांच्या कालावधीत ईडीने 6 हजार गुन्ह्यांची नोंद केली. चौकशी केल्यानंतर सत्यावर आधारित फक्त 25 खटले निघले. त्या 25 खटल्यांपैकी फक्त दोघांना शिक्षा झाली. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ईडीने 404 कोटी रुपये खर्च केले. हे करत असताना ईडी कोणाच्या मागे लागली. गेल्या 18 वर्षांत 147 नेत्यांची चौकशी झाली. त्यात 85 टक्के नेते हे विरोधी पक्षाचे होते. भाजपा सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत 121 नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये असलेले 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार यांच्यावर कारवाई करण्यात आली अशी आकडेवारी शरद पवार यांनी सादर केली.

हेही वाचा : Ajit Pawar : आधी संघटना मजबूत करू, नंतर मुख्यमंत्रीपदाचं पाहू- अजित पवार

सत्तेचा दुरूपयोग केल्या जातोय

आयोजित मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आज आपण वेगळ्या स्थितीतून जात आहोत. केंद्रातील सत्ता एका पक्षाच्या हातात आहे. उत्तरेकडील राज्यांचीही सत्ता भाजपाच्या हातात आहे. त्यांची धोरणं सामाजिक ऐक्याला धक्का पोहोचवणारी आहेत. या धोरणांचा पुरस्कार त्यांच्याकडून केला जातो. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. आज भाजपाच्या विचाराच्या विरोधात कोणी भूमिका घेत असेल तर सत्तेचा दुरुपयोग करून कारवाई केली जाते. अगोदर लोकांना ईडी हा शब्द माहीत नव्हता. आता ईडी हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -