घरदेश-विदेशSharad Pawar : केजरीवालांच्या अटकेवर शरद पवारांचा संताप, म्हणाले - भाजपाच्या आता...

Sharad Pawar : केजरीवालांच्या अटकेवर शरद पवारांचा संताप, म्हणाले – भाजपाच्या आता दोन जागाही…

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना काल रात्री अटक करण्यात आल्याने विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. शरद पवार यांनी देखील या अटकेचा निषेध केला आहे.

पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर भाजपाने कारवाई करत मोठे संकट स्वतःवर ओढावून घेतले आहे. यामुळे केजरीवाल यांनाच मोठे मताधिक्य मिळणार आहे. मागच्या वेळी विधानसभेत भाजपाल 70 पैकी तीन जागांवर विजय मिळवता आला होता, पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये तितक्याही जागा त्यांना मिळणार नाही. पण केजरीवाल यांच्या नेतृत्वात 100 टक्के जागा निवडून येतील, असा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. (Sharad Pawar expressed displeasure over Arvind Kejriwal’s arrest)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल गुरुवारी (ता. 21 मार्च) रात्री ईडीकडून अटक करण्यात आलीय दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर देशभरातले सर्व विरोधी पक्ष केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. याच प्रकरणावर बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी या अटकेचा निषेध करत म्हटले की, काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबले. त्यापाठोपाठ आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून ही अटक करण्यात आली आहे. प्रत्येक राज्यात असे धोरण असते. राज्यांच्या मंत्रिमंडळाला हे धोरण बनवण्याचा अधिकार असतो. हे धोरण बनवणारी एक अधिकृत यंत्रणा असते. कदाचित त्यात काही चुकले असेल. परंतु, त्यासाठी भाजपाने लोकांमध्ये जाऊन हा प्रश्न उपस्थित करावा, यात काही कायदेशीर बाबी असतील तर न्यायालयात जावे. त्यांनी या प्रकरणी यापूर्वीच दोन-तीन जणांना अटक केली आहे. आता राज्याच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. राज्याचे धोरण ठरवले म्हणून अशा प्रकारे अटक करणं चुकीचे आहे, असे शरद पवारांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

- Advertisement -

निवडणुकीवर याचा परिणाम होणार…

तसेच, अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे या घटनेचा परिणाम निवडणुकीवर होईल आणि आगामी निवडणुकीत केजरीवाल यांचे उमेदवार सर्व जागांवर जिंकतील. मागच्या वेळी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे दिल्लीत 70 विधानसभेच्या जागांपैकी केवळ तीन उमेदवार निवडून आले होते. पण आता केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आपचे 100 टक्के उमेदवार निवडून येतील. दिल्लीच्या मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ तीन जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी त्यांना एकही जागा मिळणार नाही. लोक पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या बाजूने कौल देतील. तसेच ज्यांनी या सर्व कारवाया केल्या त्यांच्या थोबाडीत लगावतील, असे सांगत शरद पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -