शरद पवार इन ॲक्शन मोड, आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी पवारांचा ४ दिवस विदर्भ दौरा

Sharad pawar four days vidarbh tour for ncp member meeting and party work

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी मैदानात उतरले आहेत. राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आढावा बैठका घेतल्यानंतर आता शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. पुढील ४ दिवस विदर्भ दौरा करुन निवडणुकीच्या मोर्चेबांधणीवर चर्चा करतील. ४ दिवसांमध्ये शरद पवार ५ जिल्ह्यांतील कामाचा आढावा घेतील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. या दौऱ्यामध्ये पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी सभा घेणार आहेत. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विदर्भाचा दौरा केला होता यानंतर आता शरद पवार दौऱ्यावर आहेत. विदर्भात राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी हे दौरे फार महत्वाचे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भात फारसा प्रभाव राहिला नाही. नागपूरमध्ये देखील राष्ट्रवादी कमकुवत झाली असल्याचे दिसत आहे. महापालिकेमध्ये सध्या राष्ट्रवादीचा एकच सदस्य आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ या नेत्यांनी विदर्भ दौरा केला होता. यावेळी स्थानिक नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन काही प्रश्न सोडवण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार १७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर पर्यंत विदर्भ दौरा करणार आहेत. दौऱ्यादरम्यान नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. व्यापारी, शेतकरी आणि उद्योजकांसोबत चर्चा करतील. विदर्भात भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता शरद पवार विमानाने नागपूर विमानतळावर पोहचतील. त्यानंतर ३ वाजता पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतील ४ वाजता पत्रकार परिषद घेतील आणि ५ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.

सुप्रिया सुळे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे विकासकामांचा आढावा घेणार आहेत. तसेच कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत. जिल्ह्यातील शरद कृषि भवनची पाहणी करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता सुप्रिया सुळे पद्मश्री पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ कलावंत परशुराम गंगावणे यांची सदिच्छा भेट घेतील.


हेही वाचा : स्वातंत्र्य भीक असे संबोधणाऱ्यांना बाळासाहेबांनी पाच फूट जमिनीत गाडले असते, राऊतांचा घणाघात