घरमहाराष्ट्रSharad Pawar Funda : पक्षाचे नाव ठरविताना 25 वर्षांपूर्वीचीच चाल; राष्ट्रवादीवर पवारांचीच...

Sharad Pawar Funda : पक्षाचे नाव ठरविताना 25 वर्षांपूर्वीचीच चाल; राष्ट्रवादीवर पवारांचीच छाप

Subscribe

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हवाली केले. त्यामुळे शरद पवार यांच्या गटासाठी नेमके काय नाव असेल, याबाबत तर्क वर्तविण्यात येत होते. पण निवडणूक आयोगाकडून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या नावाला मान्यता मिळाली. मात्र यावरून खासदार शरद पवार यांनी 25 वर्षांपूर्वीचीच चाल खेळताना राष्ट्रवादी काँग्रेसवरील आपलीच छाप कायम ठेवल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा – Rohit Pawar : महाराष्ट्रातील थोर व्यक्तींचा इतिहास आधी…; रोहित पवारांचा आदित्यनाथांवर निशाणा

- Advertisement -

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थक नेत्यांनी संताप व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. पण अशा परिस्थितीत, राजकारणातील भीष्म अशी ओळख असलेल्या शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सबुरीचा सल्ला दिला होता. ‘एकदा निकाल आल्यानंतर त्यावर चर्चा करता येत नाही, तो निकाल मान्य करत नवीन चिन्ह घ्यायचे. त्याचा फार काही विपरित परिणाम होत नाही, लोक ते चिन्ह स्वीकारतात,’ असे शरद पवार यांनी म्हटले होते.

वर्षभरानंतर अशीच घटना त्यांनी स्थापन केलेल्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’बाबत घडली. यावेळी देखील शरद पवार यांनी संयमी भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाचा निकाल समोर येताच, शरद पवार समर्थक नेत्यांनी ‘आमचा पक्ष आणि निशाणी शरद पवार’ असे घोषवाक्य सोशल मीडियावर शेअर केले. यावरूनच शरद पवार आणि त्यांच्या समर्थक नेत्यांना या निकालाचा अंदाज आला होता, असा तर्क मांडला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – UBT Convention: ‘आले मोदींच्या मना’, भारतरत्नांची जणू खैरातच; कर्पूरी ठाकूर यांचा उल्लेख करत ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका

याशिवाय, निवडणूक आयोगाने आपल्या पक्षाला नवे नाव सुचविण्याची अल्पमुदत दिली होती. त्यानुसार शरद पवार यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदराव पवार’ आणि ‘एनसीपी – शरद पवार’ अशी तीन नावे सुचविली होती. याद्वारे त्यांनी 25 वर्षांपूर्वी म्हणजेच 1999मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताना जी चाल खेळली होती. त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी केली.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्याने त्यांच्या पक्षाच्या या नावाला काँग्रेसने त्यावेळी आक्षेप घेतला होता. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी हे नाव निवडल्याचा आरोप त्यावेळी काँग्रेसने केला होता. इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी (Indian National Congress Party) आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (Nationalist Congress Party) असे साधर्म्य असलेले नाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे 1999च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती विरुद्ध काँग्रेस अशा लढतीची अपेक्षा असताना शिवसेना भाजपा युती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र होते. पण या निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले.आताही ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ या नावापुढे आपले नाव पुढे जोडत शरद पवार यांनी या पक्षावरील आपली छाप सोडलेली नाही. तसेच ग्रामीण भागातील मतदारांना अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या राष्ट्रवादी पक्षाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे नामकरणही पवारांकडून?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार असे आपल्या नव्या पक्षाचे नामकरण शरद पवार यांनी केले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे नावही उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सल्लामसलत करून ठरवले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावरून शिवसेनेलाही ठाकरे हे नाव जोडल्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्यावेळ लाभ होऊ शकतो, असे यामागील गणित असावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -