एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या शुभेच्छा

Sharad Pawar

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटरवरून एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे. असे म्हणत पवारांनी एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो.

स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे, असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे.

एकनाथ शिंदेंचे नवं ट्विट

मुख्यमंत्रीपदी नावाची घोषणा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…! महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…असल्याचे म्हटले आहे.