Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. शरद पवार यांची आज ब्रिट कँडी रुग्णालयातील डॉक्टरच्या टीमने तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ३० मार्चला शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नवाब मलिक यांनी दिली. “शरद पवार साहेबांची आज डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि १५ दिवसानंतर जर त्यांचे सर्व आरोग्याचे मापदंड स्थिर राहिले तर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाईल,” अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली.

- Advertisement -

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व हितचिंतकांना विनंती आहे की, त्यांना बरे होण्यासाठी पूर्ण विश्रांती आवश्यक असल्याने त्यांनी शरद पवार यांना भेटण्यासाठी येऊ नये, आपल्या सर्व सहकार्याबद्दल आणि पवार साहेबांना शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद,” असं देखील नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -