घरताज्या घडामोडीSharad Pawar : शरद पवार माढ्यातून जानकरांना उमेदवारी देणार? 9 जणांची संभाव्य...

Sharad Pawar : शरद पवार माढ्यातून जानकरांना उमेदवारी देणार? 9 जणांची संभाव्य यादी समोर

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर भाजपसह काँग्रेसने आपल्या उमदेवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतेक मतदारसंघात विद्यमान खासदारांना तिकीट न देता नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. अशातच यंदा महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा लढा असणार आहे. त्यामुळे मित्र पक्षांचाही विचार करत त्यांना उमेदवारी दिली जात आहे. यापार्श्वभूमीवर सध्या चर्चा आहे ती लोकसभेच्या माढा लोकसभा मतदारसंघाची. कारण या मतदारसंघातून भाजपचे मित्र पक्ष असलेल्या रासपचे नेते महादेव जानकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र महायुतीकडून त्यांना उमेदवारीची शक्यता कमी असल्याने ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संभाव्य यादी समोर आली असून यामध्ये माढ्यातून महादेव जानकरांना उमेदवारी दिल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी पहिले 9 संभाव्य उमेदवार ठरले आहेत. या 9 जणांच्या यादीत शरद पवारांनी अनेक नवी आणि चर्चेचा विषय ठरणारी नावे दिली आहेत. विशेष म्हणजे राज्यभरात सध्या चर्चेत असलेल्या माढा लोकसभेची जागा शरद पवारांनी महादेव जानकर यांच्या रासपसाठी सोडली आहे. संभाव्य यादीनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महादेव जानकरांना माढ्यातून उमेदवारी जाहीर झाल्यास भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या महायुतीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, भाजपाने माढा लोकसभेसाठी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी घोषीत केली. त्यामुळे धैर्यशील मोहीते पाटील नाराज आहेत. शिवाय, रासपचे महादेव जानकर हे देखील माढातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. याकरीता काही दिवसांपूर्वी महादेव जानकरांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यावेळी महादेव जानकरांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. महाविकास आघाडीत शरद पवारांशिवाय आपले कोणाशी काही बोलणे झालेले नाही, असे महादेव जानकरांनी म्हटले होते. तसेच, महाविकास आघाडी परभणीची जागा आपल्याला द्यायला तयार नाही आणि महायुतीचा माढाचा उमेदवार ठरला आहे. त्यामुळे माढा आणि परभणी अशा दोन्ही ठिकाणांवरुन आपण निवडणूक अर्ज भरणार असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले होते.

जागा आणि संभाव्य उमेदवार

  • बारामती – सुप्रिया सुळे
  • माढा – महादेव जानकर (रासप)
  • सातारा – बाळासाहेब किंवा श्रीनिवास पाटील
  • शिरुर – अमोल कोल्हे
  • नगर दक्षिण – निलेश लंके
  • बीड – बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे
  • वर्धा – अमर काळे
  • दिंडोरी –
  • रावेर –

लोकसभेसाठी माढाची जागा इंडिया आघाडीतून आम्हाला द्या अशी मागणी आता शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीदेखील केली आहे. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना माढातून उमेदवारी द्यावी असी मागणी जयंत पाटीलांनी केली. डॉ. अनिकेत देशमुख यांनी 2019 ला विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, महाविकास आघाडी जो उमेदवार निश्चित करेल त्याला आमचा पाठिंबा असेल असेही जयंत पाटील यांनी म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -