Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पवार साहेब सर्वात आवडतं काम करताना, सुप्रिया सुळेंकडून हॉस्पिटलमधील फोटो ट्विट

पवार साहेब सर्वात आवडतं काम करताना, सुप्रिया सुळेंकडून हॉस्पिटलमधील फोटो ट्विट

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना काल (मंगळवार) पोटदुखी होत असल्यामुळे तात्काळ ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात झालेल्या खड्यांमुळे शरद पवार यांना पोटदुखी होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर काल रात्री पवारांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शरद पवारांचा रुग्णालयातला फोटो ट्विटद्वारे शेअर करून डॉक्टर्ससह नर्सचे आभार मानले आहेत.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

‘सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत,’ असे सुप्रिया सुळेंनी ट्विटकरत शरद पवारांचा पेपर वाचतानाचा फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पित्ताशयात खड्डे झाले होते. हे खड्डे शस्त्रक्रिया करून काढण्यात आले असून शरद पवारांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. सध्या शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान शरद पवारांवर ब्रीच कॅंडीत शस्त्रक्रिया करणाऱ्या टीममध्ये डॉ. मायदेव, डॉ. गोलावाला, डॉ. दफ्तरी, डॉ समदानी, डॉ. तिब्रेवाला या डॉक्टरांची टीम होती. तर कुटूंबीयांपैकी स्वतः सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अजितदादा पवार हे ब्रीच कॅंडी येथे उपस्थित होते. माहितीनुसार, काही दिवसानंतर शरद पवारांवर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया होणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar health update : पवारांवर शस्त्रक्रिया यशस्वी, ४ दिवसात डिस्चार्ज


 

- Advertisement -